spot_img
अहमदनगरपराभवानंतर आमदार थोरात कडाडले; म्हणाले, नवीन आमदार 'त्यांचे' हत्यार

पराभवानंतर आमदार थोरात कडाडले; म्हणाले, नवीन आमदार ‘त्यांचे’ हत्यार

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला. निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत त्यांचे होमग्राऊंड संगमनेरमध्ये पराभवानंतर पहिल्यादांच जाहिररीत्या विरोधकांवर कडाडले. मी स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. नव्याने उभारी घेणार आहोत. आता आपले आमदार सत्यजित तांबे आहे. त्यांच्या माध्यमातून काम मार्गी लावू, असे सांगून सत्यजित तांबे यांना काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय करण्याचे संकेत यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रवरा कारखान्याने आपल्या तालुक्यात गट ऑफिस सुरू केलं. आता यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर देखील राहील. नवीन आमदार झाल्यानं त्यांना ही हिंमत झाली आहे. नवीन झालेला आमदार हे त्यांचे हत्यार आहे. काही मंडळी मला म्हणत होती की तुम्ही तिकडे कशाला गेले. मात्र त्यांनी मंत्री (विखे पाटील) झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या. मग माझ्याकडे पर्याय नव्हता. मी हा अन्याय सहन करू शकत नाही. त्यानंतर तिकडे गेलो आणि गणेश कारखाना ताब्यात घेतला. मी स्वतः यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहणार आहे. काही झालं तरी देखील मी उभा राहणार, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना दिला.

विधानसभेचा निकाल लागला आणि आपल्याला धक्का बसला. आपल्याला मताधिक्य किती राहील याचा विचार आपण करत होतो. हे सगळं होत असताना पराभव झाला. हा धक्का बसला हे मान्य करावं लागेल. 1985 पासून एक वेगळ्या पर्वाची आपण सुरुवात केली. संगमनेर तालुक्याची वेगळी संस्कृती आपण निर्माण केली. चाळीस वर्ष आपण मला संधी दिली.

प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला विधानसभेत पाठवले. यावेळी देखील तुम्ही काम करत होतात, मी राज्यात फिरत होतो. मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. पण नेमकं काय घडलं हे आजही समजत नाही. प्रत्येक जण वेगवेगळे कारण सांगत आहे. सगळ्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. जे दोष असतील ते निश्चित दूर करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जुन्या पिढीला सगळा इतिहास माहिती आहे. मात्र तरुण पिढीला ते अजूनही माहित नाही. 1985 मध्ये काय परिस्थिती होती आणि आज काय याचा विचार केला पाहिजे. निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी आज अनेक जण पुढे येत आहे. मात्र त्यांचा सहभाग काय हे एकदा त्यांनी सांगावे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.

तर, शहराचा पाणी प्रश्न मी कायमचा सोडवला. थेट धरणातून पाईपलाईन शहरासाठी आणली. मात्र, ज्यांनी त्या दिवशी फटाके वाजवले ना त्यांनी सुद्धा आपण आणलेलंच पाणी घरात गेल्यावर पिले असेल. थोडी तरी कृतज्ञता ठेवायला हवी, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातून कमी मताधिक्य मिळाल्याने भाषणातून नाराजी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....