spot_img
राजकारणनरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी गडकरी, योगी नव्हे तर भाजपमधीलच 'या' व्यक्तीला आहे...

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी गडकरी, योगी नव्हे तर भाजपमधीलच ‘या’ व्यक्तीला आहे सर्वात जास्त पसंती ! पहा सर्व्हेचा निकाल..

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : केंद्रात 2014 साली भाजपाच सरकार सत्तेवर आले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने हे मोठे यश संपादन केले होते. त्यानंतर २०१९ मधेही भाजपने मोठे यश मिळवले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा असा आहे की, भाजपा एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत आहे.

आजही मोदी यांचा करिष्मा कायम आहे. मूड ऑफ न नेशनच्या ओपनियन पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येतील असा अंदाज वर्तवला आहे. देशात आज सर्वत्र मोदींचा चेहरा आहे. पण नरेंद्र मोदींनंतर पुढे कोण? असा प्रश्न आज अनेक लोकांच्या मनात आहे.

मूड ऑफ द नेशनच्या ओपनियन पोलमध्ये हाच प्रश्न सर्वसामान्यांना विचारण्यात आला. त्यावेळी 29 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाहना पसंती दिली. तेच मोदींचे उत्तराधिकारी आहेत, असं या लोकांना वाटतं. तेच 25 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती दर्शवली. आदित्यनाथ मोदी यांचा वारसा पुढे नेऊ शकतात असं या लोकांना वाटतं. म्हणजे अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये सध्या फक्त 4 टक्के मतांच अंतर आहे. दोघेही सध्या देशात महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. सर्वसामान्य लोकांशी निगडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारी दोन्ही नेत्यांकडे आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 16 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. नितीन गडकरी यांच्याकडे विकासाच व्हिजन असलेला नेता म्हणून पाहिलं जातं. पण सर्वेमध्ये असं दिसून आलय की, जनतेला जास्त कठोर छबी, निर्णय क्षमता असलेला नेता जास्त भावतो. मूड ऑफ द नेशनमध्ये सर्व लोकसभा मतदारसंघातील एकूण 35,801 लोकांशी बोलून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान हा सर्वे करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...