spot_img
देशकबीर खान 'टायगर ' आणि ‘बजरंगी भाईजान’ नंतर सलमान खानला बनवणार 'बब्बर...

कबीर खान ‘टायगर ‘ आणि ‘बजरंगी भाईजान’ नंतर सलमान खानला बनवणार ‘बब्बर शेर’?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री

चित्रपट निर्माते कबीर खान नवीन चित्रपट बनवणार आहे. कबीर आणि सलमानने एक था टायगर, बजरंगी भाईजान आणि ट्यूबलाइट या तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

सुरु असलेल्या एका चित्रपटाचे काम पूर्ण केल्यानंतर कबीर खान बब्बर शेर नावाचा चित्रपट बनवणार आहे. ‘बब्बर शेर’च्या बातमीने सलमान खानचे चाहते खूपच खूश आहेत.

रिपोर्टनुसार, सलमान खान आणि कबीर खान या जोडीने अनेक उत्कृष्ट चित्रपट एकत्र दिले आहेत. कबीर खान आपल्या रायटिंग पार्टनरसोबत ग्रँड लेव्हल फिल्म बनवण्याच्या तयारीत आहे.

सध्या या चित्रपटाचे नाव बब्बर शेर ठेवण्यात आले आहे. भविष्यात हे देखील बदलले जाऊ शकते. कबीर खानला हा मोठा प्रोजेक्ट एका मोठ्या स्टारसोबत करायचा असून आपल्या चित्रपटाची कथाही त्यांनी एका मोठ्या स्टारला सांगितल्याची बातमी समोर आली आहे.

जानेवारीमध्ये ‘चंदू चॅम्पियन’चे शूट संपल्यानंतर कबीर सुपरस्टारसोबत आणखी काही भेटीगाठी करणार आहेत. या चित्रपटाचे काम जून-जुलै २०२४ पासून सुरू होऊ शकते.

या चित्रपटाशी एका मोठ्या सुपरस्टारचे नाव देखील जोडले जात आहे, त्यामुळे ते सलमान खानबद्दल बोलत असल्याचे सोशल मीडिया वापरकर्त्यांना वाटते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री    श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा...

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...