spot_img
ब्रेकिंगपर्यटकांसाठी खुशखबर! कळसुबाई शिखरावर मिळणार 'ही' सुविधा, सरकारचा 'मोठा' निर्णय

पर्यटकांसाठी खुशखबर! कळसुबाई शिखरावर मिळणार ‘ही’ सुविधा, सरकारचा ‘मोठा’ निर्णय

spot_img

नाशिक। नगर सहयाद्री-
स्वातंत्र्यसेनानी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी (ता. इगतपुरी) येथील स्मारकाच्या उभारणीसाठी ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर कळसूबाई शिखरावर रोप वे उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राघोजी भांगरे यांच्या स्मारक कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार बैठक झाली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, दिलीप वळसे-पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, नितीन भुसारा, वित्त विभाग, ग्रामविकास विभागाचे सचिव, नाशिकचे जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून स्मारक मंजूर झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३८८ कोटी ८४ लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसर्‍या टप्प्यात उर्वरित कामासाठी ९६ कोटी रुपये निधीस मंजुरी देण्याचे निश्चित झाले होते. त्याचबरोबर स्मारक ठिकाणापासून जवळच असलेल्या कळसूबाई शिखरावर ये-जा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली.

त्यानुसार त्याचा २११ कोटी रकमेचा स्वतंत्र डीपीआर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय झाला होता. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे स्मारकाचा सर्व खर्च सुमारे ४८३ कोटी रुपयांपर्यंत करण्यास उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्यता दिली.

स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आदिवासी विभागामार्फत करण्याचे ठरले आहे. स्मारकाच्या कामकाजासाठी एक समिती बनविणार असून, त्यात पर्यटन व ग्रामविकास सचिव, वास्तुविशारद, आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, जिल्हाधिकारी असणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...

पत्नीच्या डोक्यात घातला शॉकॉबसर; प्रेमविवाहाला कुणाची नजर लागली?, वाचा सविस्तर

Maharashtra Crime: विभक्त पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या अमरसिंग मारुती शिंदे (वय ३७, रा. इस्लामपूर)...