spot_img
अहमदनगरनगर शहराच्या सौंदर्यात भर पडणा! 'त्या' कामासाठी 6 कोटींची मान्यता; सावेडी, केडगाव,...

नगर शहराच्या सौंदर्यात भर पडणा! ‘त्या’ कामासाठी 6 कोटींची मान्यता; सावेडी, केडगाव, मुकुंदनगर भागात…

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सात ओपन स्पेसमध्ये उद्यानासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पर्यावरण विभागाकडे सतत पाठपुरावा केल्याने बक्षिसाच्या रक्कमेतून नव्याने सहा कोटींच्या निधीतून उद्याने व सौरउर्जा प्रकल्पास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. आ. जगताप यांनी गेल्या काही महिन्यांत शहर विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला आहे. शहरातील रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी आला. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. उद्याने ही शहराच्या सौंदर्यात भर घालतात. महापालिकेला मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गत बक्षीस मिळाले होते.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी नगर महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीची दखल पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने घेतली. बक्षिसाच्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून नव्याने उद्याने विकसित करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता.
सावेडी, केडगाव, बोल्हेगाव, मुकुंदनगर, सारसनगर, बुरूडगाव रस्ता भागात महापालिकेच्या ओपन स्पेसवर नव्याने उद्याने प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. राज्य शासनाच्या पर्यावरण विकास विभागाने 6 ऑगस्ट 2024 रोजी आदेश काढून नगर शहरातील सुमारे 9 उद्यानांसाठी प्रशासकीय मान्यता देत सुमारे 6 कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे नगर शहरातील उद्यानांमुळे शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे.

तसेच, सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल येथे सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यासह जनजागृती, सुशोभीकरण असे इतर उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. राज्य शासनाने या प्रकल्प अहवालाला मान्यता दिली आहे. यामुळे शहरात नव्याने उद्यानांची निर्मिती होऊन ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना विरंगुळ्यासाठी, खेळण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत महानगरपालिकेला राज्यात दुसर्‍या क्रमांकाचा 6 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. या बक्षिसाच्या रकमेतून नगर शहरात सात उद्याने व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल,असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...