spot_img
महाराष्ट्रकारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अहिल्यानगर कारागृहातील आरोपी किरण बबन कोळपे (विळद, ता. नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून ओळख असून, तक्रारदार एका गुन्ह्यात साक्षीदार आहे. याच प्रकरणावरून आरोपीने जिल्हा कारागृहातून पत्र पाठवून धमकी दिली, असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रात आरोपीने स्वतःच्या पोलिस खात्यातील १५ वर्षांच्या सेवाचा उल्लेख करत तपास अधिकाऱ्यांसह साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराने यापूर्वीही संबंधित आरोपीविरुद्ध विविध तक्रारी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

विसर्जन मिरवणुकीत एकाला मारहाण
शिराढोण (ता. नगर) येथील गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान बॅनर लावण्याच्या वादातून एका व्यक्तीस मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी सोमनाथ तात्याभाऊ बाघ यांच्यासह पाच जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शिराढोण येथील माळवाडी शिवारात घडली.तक्रारदार सुनिल राजेंद्र दरेकर यांनी गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान बॅनर लावला होता. यावरून वाद झाला आणि सोमनाथ बाघ, अरुण बाघ, हरिष वाघ, मिनाबाई बाघ, तात्याभाऊ बाघ यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींनी मिळून दरेकर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातील कॉपर कॉइल लंपास
विलद येथील महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मरमधून सुमारे ३५ हजार रुपये किमतीची कॉपर कॉइल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात असलेल्या जुन्या ट्रान्सफॉर्मरची वरची प्लेट उघडून चोरट्यांनी कॉपर कॉइल चोरून नेली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक यंत्रणेतील ही चोरी गंभीर मानली जात असून, यामुळे काही प्रमाणात पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या छेडछाडमुळे विद्युत पुरवठ्यावरही ताण येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...

उद्धव ठाकरे दोन शिलेदारांसह ‘शिवतीर्थवर’; पुन्हा एकदा घेतली राज ठाकरेंची भेट, युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई  । नगर सहयाद्री:- महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब...