spot_img
अहमदनगरAhmednagar Crime News : पती, दिराकडून विवाहितेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची...

Ahmednagar Crime News : पती, दिराकडून विवाहितेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, पतीला बेड्या

spot_img

Ahmednagar Crime News : अहमदनगर / नगर सह्याद्री – विवाहितेवर पती व दिराने शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पतीला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुरूवातीला त्याला सायबर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. सायबर पोलिसांनी संशयित आरोपीला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित विवाहितेचे सासर मुंबई असून, तिथेच तिच्यावर अत्याचार झाला. विवाहिता नगरमध्ये माहेरी आल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. तोफखाना पोलीस ठाण्यात पती, दीर व सासू-सासर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेचा मे २०२३ मध्ये आरोपी पतीशी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांत सासरच्यांनी विवाहितेचा माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ सुरू केला. मुंबई येथे सासरी असताना पती व दिराने विवाहितेवर अत्याचार करत मारहाण केली. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास शारीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून तिच्या पती विरोधात येथील सायबर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी पीडितेच्या पतीला मुंबई येथून ताब्यात घेतले होते. त्याला अत्याचाराच्या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वक्फ बोर्डबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

३ सदस्य बिगर मुस्लिम राहतील, पण ५ वर्षांची अट नाकारली नवी दिल्ली / वृत्तसंस्था - वक्फ...

मनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

शहरप्रमुख काळेंचा संतप्त सवाल / राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत शहर ठाकरे सेनेने घेतली १४...

“रस्त्यावर कचरा नकोच आता…, नाही सहन होणार रस्त्यावरील घाण आता…”

हातात फलक, ओठांवर घोषणा घेऊन नागरिकांची स्वच्छता रॅली अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील सर्वत्र साचलेल्या...

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...