spot_img
अहमदनगरएमआयडीसीत युवकावर कोयत्याने हल्ला; असा घडला प्रकार

एमआयडीसीत युवकावर कोयत्याने हल्ला; असा घडला प्रकार

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळ जवळ, माताजीनगर येथे एका युवकावर जुन्या वादातून चार जणांनी कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी (19 मे) सकाळी 6.45 वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी जमीर शौकत पठाण (वय 23, रा. मोरया पार्क, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना, अशिष शिरसाठ, चैतन्य सरोदे, प्रेम नायर उर्फ रावण व विशाल आडगळ (सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी त्यांना अडवून जुन्या वादातून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर कोयत्याने दोन्ही पायांवर व हातावर वार करून जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या गुन्ह्यात संशयित आरोपींनी लाल रंगाची स्वीफ्ट कार वापरली होती. जखमी जमीर पठाण यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणार्‍या चौघा संशयितांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पितळे करीत आहेत.

दरम्यान, एमआयडीसी परिसरात कोयता, तलवार या सारख्या धारदार शस्त्राने हल्ले केले जात आहे. व्यावसायिक, एमआयडीसी कामगार यांच्यावर वारंवार होणार्‍या हल्ल्यामुळे एमआयडीसीतील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन हल्ला करणार्‍यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन; लष्कर-ए-तैयबाची मोठी योजना?

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या...