spot_img
अहमदनगरशहरात खळबळ! गर्ल्स हॉस्टेलमध्ये वेश्यावसाय, व्हॉट्सअ‍ॅपवर बुकिंग घेणारे जाळ्यात...

शहरात खळबळ! गर्ल्स हॉस्टेलमध्ये वेश्यावसाय, व्हॉट्सअ‍ॅपवर बुकिंग घेणारे जाळ्यात…

spot_img

Crime news: एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी कारवाई करत हॉस्टेलवर छापा टाकून १० तरुणींसह एकूण ११ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गर्ल्स हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुली आणि तरुणींचा वापर देहविक्रीसाठी केला जात होता. या रॅकेटमध्ये तरुणींच्या “डील” व्हॉट्सअ‍ॅपवर निश्चित केल्या जात असून, त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जात होते. या बदल्यात मोठ्या रकमेचा व्यवहार केला जात होता, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने हॉस्टेलवर अचानक छापा टाकून ही कारवाई केली. तपासात असं समोर आलं आहे की, संबंधित हॉस्टेलचा वापर बराच काळ देहविक्रीसाठी केला जात होता.या रॅकेटमध्ये बाहेरील काही व्यक्तींचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आणखी काही जणांविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता असून, मुख्य सूत्रधार आणि सहाय्यकांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.

दरम्यान, पीडित तरुणींना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित डिजिटल पुरावे, संवाद आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करण्यात येत आहे. याप्रकरणी रांचीच्या लालपूर परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रांची शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि गर्ल्स हॉस्टेलच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांकडून संबंधित प्रशासनावर कारवाईची मागणी केली जात आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...