spot_img
अहमदनगरअहिल्यानगरमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या 'बड्या' नेत्याला अटक, कार्यालयातच केला महिलेवर अत्याचार..

अहिल्यानगरमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या ‘बड्या’ नेत्याला अटक, कार्यालयातच केला महिलेवर अत्याचार..

spot_img

संपर्क कार्यालयातच महिलेवर अत्याचार; शहरप्रमुख किरण काळे यांना अटक
अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
विवाहित तरूणीला मदतीचं आमिष दाखवून ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे (रा. अहिल्यानगर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी काळे यांना अटक केली आहे. पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करुन दुपारनंतर न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

21 वषय पीडितेच्या फिर्यादीनुसार, पतीकडून होणाऱ्या त्रासातून वाचवण्याबाबत 2021 पासून नेहमी बोलणे व्हायचे. 2023 मध्ये काळे यांनी अहिल्यानगरमध्ये बोलावून घेतले. माळीवाडा बसस्थानक येथे आले असता काळे यांनी त्यांच्या चारचाकी गाडीतून चितळे रोडवरील त्यांच्या ऑफिसवर नेले. तेव्हा ऑफिसमध्ये कोणीही नव्हते. त्यांनी जवळ खुचवर बसण्यास सांगितले व अडचणींची विचारपूस करत वाईट हेतूने स्पर्श केला.

काळेंनी 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंत त्याच्या चितळे रोड येथील ऑफिसमध्ये तिला तिच्या पतीकडून होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी मदतीचे आमिष दिले. मात्र त्या विश्वासाचा गैरफायदा घेत, संशयित आरोपीने तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. या प्रकारानंतर पीडितेला धमकी देत संशयित आरोपीने तिला जर हे कुणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत शिवीगाळही केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...