अहमदनगर। नगर सहयाद्री
दरोड्याचे तयारीतील असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भरत विलास भोसले ( वय – 45 वर्षे, रा. हातोळण, ता. आष्टी, जि. बीड) रावसाहेब विलास भोसले ( वय – 47 वर्षे, रा. सदर ) अजिनाथ विलास भोसले ( वय – 35 वर्षे, रा. सदर ) बबलु रमेश चव्हाण ( वय – 24 वर्षे, रा. परीते, ता. माढा, जि. सोलापुर) कानिफ कल्याण भोसले (वय – 20 वर्षे, रा. पारोडी, ता. आष्टी, जि. बीड ) अभिष छगन काळे ( वय 24 वर्षे, रा. अंतापुर, ता. गंगापुर, जि. छ. संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून कान्ह्या उर्फ कानिफ उध्दव काळे ( रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड ), कृष्णा विलास भोसले ( रा. हातोळण, ता. आष्टी, जि. बीड ) विनोद जिजाबा भोसले (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड ) हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेश दिले होते. नमुद आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. आरोपींची माहिती काढत असताना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की भरत विलास भोसले ( रा. हातोळण, ता. आष्टी, जि. बीड) हा त्याच्या साथीदारांसह वाळुंज बायपासचे लगत अंधारामध्ये थांबुन दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने वाळुंज बायपास जवळ जावुन खात्री केली असता काही संशयीत रात्रीच्या अंधारात रोडच्या कडेला दबा धरुन बसलेले दिसले. पथकाची चाहूल लागताच अंधारामध्ये थांबलेले तीन आरोपी त्यांच्या कडील दोन मोटारसायकल चालु करुन भरधाव वेगाने सोलापुर रोडने निघुन गेले तर उर्वरीत सहा आरोपीना पोलिसांनी शिताफीनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1 तलवार, 1 सुरा, 02 लोखंडी कटावण्या, लाकडी दांडा, मिरचीपुड, मोबाईल, दोन मोटारसायकल असा एकुण 1, लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्ष प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण दिनेश आहेर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली आहे.
सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद
आरोपी भरत विलास भोसले हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द अहमदनगर, सोलापुर, बीड, पुणे जिल्ह्यामध्ये मोक्का, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण 21 गुन्हे दाखल आहे तर आरोपी रावसाहेब विलास भोसले याचेविरुध्द अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यामध्ये दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण 14 गुन्हे दाखल असून आरोपी नामे अजय विलास भोसले याचेविरुध्द पुणे, बीड, अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण 21 गुन्हे दाखल आहे. आरोपी बबलु रमेश चव्हाण याचेविरुध्द कर्नाटक राज्य व सोलापुर जिल्ह्यामध्ये खुन, दरोडा, घरफोडीचे एकुण 03 गुन्हे, आरोपी नामे कानिफ कल्याण भोसले याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा तयारी, घरफोडीचे एकुण 4 गुन्हे, आरोपी नामे अभिष छगन काळे याचेविरुध्द छ. संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, दरोडा तयारी, घरफोडीचे एकुण 03 गुन्हे दाखल आहे.