मुंबई : नगर सह्याद्री
टी 20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केलं. मुंबईत विश्वविजेत्या टीम इंडियाची जंगी मिरवणूक काढण्यात आली. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूक निघाली. त्यावेळी नरिमन पॉईंट परिसरात टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो चाहत्यांचा जनसागर उसळला. मरिन ड्राईव्हचा अथांग समुद्रकिनारा आणि त्याच्या समोरच लाखो चाहत्यांचा जनसागर असं हे चित्र होतं.
ओसंडून वाहणारा उत्साह, आसमंत भेदणारा जल्लोष असं हे सगळं वातावरण होतं.
आपल्या लाडक्या वर्ल्ड चॅम्पियन्सना पाहायला ठिकठिकाणाहून चाहते आले होते. त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत जगज्जेत्यांची विजय रॅली दिमाखात निघाली. क्रिकेटच्या पंढरीत क्विन्स नेकलेसवरचं हे दृश्य अत्यंत मनमोहक असंच होतं.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियावर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव होतोय. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणारेय. आज विधीमंडळात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात येणारेय. त्यावेळी त्यांना बक्षीसही देण्यात येणार
विधानभवनच्या सेंट्रल हॉल इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणारेय.