spot_img
महाराष्ट्रमायलेकीच्या भांडणाचा फायदा घेतला! अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले, घडलेल्या घटनेमुळे शहर हादरले

मायलेकीच्या भांडणाचा फायदा घेतला! अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले, घडलेल्या घटनेमुळे शहर हादरले

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
डोंबिवलीत उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे . मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाने एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून,तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तीच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अखेर या टिळक नगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली.पोलिसांनी एक महिलेसह तिचा पती ,दोन पुरुष अशा चार जणांना बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पीटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या आई व बहिणींसह डोंबिवली परिसरात राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून आशुतोष राजपूत या तरुणाचे त्यांच्या घरी येणे जाणे होते.तो देखील मसाले विक्रीचा व्यवसाय करत होता.

याच ओळखीचा फायदा घेत आशुतोषने पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली.अल्पवयीन मुलीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिचे आणि तिच्या आईचे भांडण झाले . रागावलेल्या पीडितेने आशुतोषशी संपर्क साधून त्याचे घर गाठले. मायलेकीच्या भांडणाचा फायदा घेत आशुतोषने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने शोधा शोध करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आशुतोष हा तिच्या आईला भेटत होता व तो मुलीला मी तुमच्या मुलीला आज या ठिकाणी बघितले त्या ठिकाणी बघितले असे सांगून मुलगी शहरातच आहे असे सांगत होता.

मुलगी रागवलेली असल्याने ते परत येईल या आशेने पीडितेची आई आशुतोष वर विश्वास ठेवत होती . मात्र दोन महिन्यांपासून मुलगी घरीच न आल्याने तिला संशय आला .तिने याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली .पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. याचदरम्यान ही मुलगी डोंबिवली जवळील ग्रामीण भागात एका घरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत या पीडित मुलीची सुटका केली. पीडित मुलीने केलेल्या खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. मुस्कान शेख तिचा नवरा यांच्यासह दोन जणांना अटक केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...