spot_img
ब्रेकिंगशहरात खळबळ! भाजपाच्या 'बड्या' नेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न,आरोपीला अटक, नेमकं काय घडलं?

शहरात खळबळ! भाजपाच्या ‘बड्या’ नेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न,आरोपीला अटक, नेमकं काय घडलं?

spot_img

पुणे । नगर सहयाद्री
भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने भीमराव यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर आमदार भीमराव तापकीर यांनी थेट पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहून परिस्थितीची माहिती दिली.

त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपींनी आमदार तपकिर यांच्या घरात तीन वेळा घुसण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्याला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरक्षारक्षकाने केला. मात्र, त्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आरोपीला बुधवारी अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहकारनगर पोलिस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...