spot_img
महाराष्ट्र10 कोटींची फसवणूक! सॉफ्टवेअरमध्ये फेरफार; नगर शहरातील खळबळजनक प्रकरण..

10 कोटींची फसवणूक! सॉफ्टवेअरमध्ये फेरफार; नगर शहरातील खळबळजनक प्रकरण..

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
शहरातील इलाईट इंटरनॅशनल या फर्ममध्ये काम करणार्‍या अकाउंटंटने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फर्मच्या टॅली सॉफ्टवेअरमधील नोंदींमध्ये फेरफार करून, बनावट नोंदी करून तब्बल नऊ कोटी 81 लाख 66 हजार 957 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. जानेवारी 2020 ते जानेवारी 2025 या कालावधीत हा अपहार झाला असून, या प्रकरणी दोघांवर मंगळवारी (27 मे) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत विनोद गांधी (वय 38, रा. कराचीवाला नगर, अहिल्यानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पुनित अभयराज गुगळे (रा. कोर्ट गल्ली, अहिल्यानगर), अन्सार निसार शेख (रा. गजराजनगर, छत्रपती संभाजीनगर रस्ता, अहिल्यानगर) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित पुनीत हा अकाउंटंन्ट म्हणून इलाईट इंटरनॅशनल या फर्ममध्ये काम करत असताना त्याने फर्मच्या अकाउंटचा युजर आयडी वापरून, फर्मच्या संपूर्ण टॅली सॉफ्टवेअर मधील व्यवहाराच्या खोट्या नोंदी दाखवल्या. त्याच्या जवळच्या व्यक्तीशी हातमिळवणी करून वेगवेगळ्या बनावट नोंदी करून कस्टम ड्युटी, इन्कम टॅक्स, इन्शुरन्स पॉलिसी, कंपनीचे सप्लायर्स अशांच्या नावाने खात्यावर पैसे ट्रान्सफर केले असे दाखवले.

मात्र, सदरच्या रकमा या त्याने त्याच्या नातेवाईकांच्या व ओळखीच्या व्यक्तींच्या खात्यावर वर्ग केल्या. तसेच, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स भारत सरकार यांचे बनावट पत्र तयार करून या विभागाला 48 लाख रूपये भरणा केल्याचे दाखविले. फिर्यादीने याबाबत खात्री करून संशयित आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने 24 लाख रूपये पुन्हा फर्मच्या नावे टाकले.

दरम्यान, फिर्यादीने खात्री केली असता शासनाच्या कोणत्याही खात्यावर अशा प्रकारे टॅक्स भरणा होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे खोट्या नोंदी घेऊन, बनावट सहीचे पत्र बनवून फिर्यादी व शासनाची फसवणूक केल्याची व 9 कोटी 81 लाख 66 हजार 957 रूपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी होऊन तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. गोटला हे करत आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...