spot_img
अहमदनगरनगरमध्ये मोठी रोकड पकडली; उमेदवाराचा मुलगा पकडला

नगरमध्ये मोठी रोकड पकडली; उमेदवाराचा मुलगा पकडला

spot_img

नागवडें पैशांसह पकडला! / दोन लाखाची रोकड सापडली | कायनेटीक चौकात अलिशान वाहनासह दिग्वीजय नागवडे व तीन तरुण पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेनेची अवघ्या दहा दिवसात पैशाच्या जिवावर उमेदवारी मिळविल्याचा आरोप असणार्‍या अनुराधा नागवडे यांचा मुलगा दिग्वीजय राजेंद्र नागवडे याला कायनेटीक चौकात नाकाबंदी चालू असताना दोन लाख रुपयांच्या रोकडसह पकडण्यात आले. दोन लाखाची रोकड आणि चार चाकी अलिशान वाहन (एमएच १२ युव्ही २५२५) पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेले वाहन शिवसेनेच्या श्रीगोंद्यातील उमेदवार अनुराधा राजेंद्र नागवडे यांचे असून या वाहनात प्रचाराचे साहित्य देखील आढळून आले. कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले.

याबाबतची अधिकची माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्ती पथके आणि नाका पथके तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार कोतवाली पोलिसांचे एक पथक पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वातील एक पथक कायनेटीक चौकात वाहनांची तपासणी करत होते. श्रीगोंद्याहून दौंड रस्त्याने येणार्‍या वाहनांची तपासणी चालू असताना त्या चौकात एमएच १२ युव्ही २५२५ हे वाहन आले. त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनातील विरेश राजेंद्र शिर्के या युवकाकडे एक लाख रुपये रोख, त्याच्या सोबतच्या ईश्वर अंबर मेहेत्रे व अविनाश बाळू इथापे यांच्याकडे प्रत्येकी ५० हजार रुपये अशी रोकड आढळून आली. आदर्श निवडणूक आचारसंहितेनुसार सोबत किती रोख रक्कम बाळगता येईल याचे नियम घालून दिले आहेत. त्यापेक्षा जास्त ही रक्कम आढळल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली.
सदरचे वाहन सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्या मालकीचे असल्याचे आरटीओ दप्तर तपासणीत स्पष्टपणे समोर आले. सदर वाहनाला निवडणुक प्रचारासाठी परवानगी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची असताना हे वाहन प्रचार साहित्यासह २२५ नगर शहर विधानसभा मतदारसंघात आढळून आल्याने त्याबाबतची वेगळी नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली.

गाडी कोणाची अन् सापडले कोण?
सदर प्रकरणात जप्त करण्यात आलेले चार चाकी अलिशान वाहन सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्या मालकीचे आहे. त्या वाहनात त्यांचा मुलगा दिग्वीजय राजेंद्र नागवडे (२०),  वीरेश राजेंद्र शिर्के (२६), ईश्वर अंबर मेहेत्रे (२५) आणि अविनाश बाळू इथापे (२०) असे चौघे सापडून आले. या चौघांसह त्यांच्याकडील रोकड आणि वाहन कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

मोठी रोकड सापडल्याची चर्चा!
पैशांच्या जिवावर कोणालाही खरेदी करू शकतो आणि काहीही करू शकतो अशी भावना राजेंद्र नागवडे यांच्या मनात कायम असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अवघ्या पंधरा दिवसात दोन-तीन राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून शेवटी दहा मिनीटात प्रवेश आणि अकराव्या मिनीटात उमेदवारी मिळवताना काही खोक्यांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप झाला. पैशांच्या याच मस्तीतून त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील वावरताना दिसतात. दरम्यान, वाहन तपासणीत मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, असे असले तरी दोन लाखाचीच रोकड सापडल्याचे पोलिस दप्तरी नोंद झाले आहे.

नागवडेंनी दिग्वीजयला सोडला अन् गरीबाघरची पोरं गुतवली!
अनुराधा राजेंद्र नागवडे यांचा दिग्वीजय हा मुलगा! मित्रांना सोबत घेऊन तो नगरला येत असताना त्याच्या वाहनात आणि त्याच्या जवळच रोकड सापडली होती असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. दिग्वीजयकडे काही लाख रुपये होते अशीही चर्चा आहे. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीच नोंद नाही. दिग्वीजयकडे पैसेच सापडले नसल्याचे पोलिस सांगत असून त्याच्या सोबतच्या मित्रांकडे पैेसे सापडल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांच्या या नोंदीबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून नागवडेंनी त्यांचा मुलगा यातून वाचवला आणि गरीबाघरची पोरं गुंतवून टाकली अशी चर्चाही झडली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विजयराव, तुम्ही त्यावेळी काय करत होतात?; राज्याचं काय झालं यापेक्षा पारनेरचं काय झालं आणि कोणामुळे झाले हे बोला!

औटींच्या विचाराचा मुख्यमंत्री असताना त्यांचे समर्थक विनाकारण पोलिस ठाण्यात डांबले जात होते! / पाठीशी...

पोलिसांत तक्रार दिली अन पुढे भलतचं घडलं

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागातून बहिण-भावाला लोेखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण...

धक्कादायक! पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, घडले असे…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अतिप्रमाणात औषधाचे सेवन (वेगवेगळ्या प्रकारच्या 10...

“बटेंगे तो कटेंगे”वरून महायुतीला तडे? फडणवीसांचं पवारांबाबत मोठं विधान…

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी शिगेला पोहोचल्या आहेत. यासोबतच योगी...