spot_img
अहमदनगरपोलिसांत तक्रार दिली अन पुढे भलतचं घडलं

पोलिसांत तक्रार दिली अन पुढे भलतचं घडलं

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागातून बहिण-भावाला लोेखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना बुधवारी (13 नोव्हेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास कौडगाव (ता. नगर) शिवारात घडली. हनुमंत लक्ष्मण गावडे (वय 30 रा. सोलापुरवाडी ता. आष्टी जि. बीड) व भागुबाई खर्से (रा. कौडगाव) अशी मारहाणीत जखमी झालेल्या बहिण-भावाची नावे आहेत.

जखमी हनुमंत गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष भगवान खर्से, सतिष भगवान खर्से (दोघे रा. कौडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीच्या बहिणीने संतोष खर्से व सतिष खर्से या दोघां विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बुधवारी सायंकाळी फिर्यादी त्यांच्या बहिणीच्या घरासमोर असताना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून संतोष व सतिष यांनी फिर्यादीला व त्यांच्या बहिणीला लोखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.

शिवीगाळ, दमदाटी करून आमच्या नादाला लागले तर जिवे मारून टाकू अशी धमकी देवून तेथून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या बहिणीने नगर तालुका पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सरोदे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...