spot_img
अहमदनगरमहापालिका आयुक्तांसह चार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा ; डॉ. बोरगे यांनी काय...

महापालिका आयुक्तांसह चार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा ; डॉ. बोरगे यांनी काय म्हटलंय पहा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त विजयकुमार मुढे, मुख्य लेखा परिक्षक विशाल पवार, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिष राजुरकर-प्रभारी वैदयकिय आरोग्य अधिकारी, यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निलंबित वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिका येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणुन दिनांक ९ मार्च २०१० पासून कार्यरत आहे. त्या करीता मा. नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक ०९ मार्च २०१० व दिनांक २० एप्रिल २०१६ रोजीचे शासन निर्णया प्रमाणे सदर पदावर नियुक्ती झालेली आहे. सदर पदावर अत्यंत इमाने इतबारे संपुर्ण माझे कौशल्य वापरुन माझ्या नियुक्ती प्रमाणे पुर्ण निष्ठेने कर्तव्य पार पाडीत आहे. परंतु आयुक्त व इतरांनी माझ्या विरोधात मनात राग ठेवून केवळ मी अनुसुचीत जातीचा आहे आणि सार्वजनीक आरोग्य विभागाच्या राज्य अधिकार्‍यांच्या रँकींग मध्ये मी या पुर्वीच २६ व्या क्रमांका वरुन १६ व्या क्रमांकावर आलेलो आहे. त्या करीता मी अनेक कष्ट करुन सेवा देवून सदरची श्रेणी प्राप्त केलेली आहे. याची जाणीव व कौतुक न करता व माझ्या बद्दल वरील प्रमाणे मी केवळ अनुसुचीत जातीचा असल्याचा मनात राग धरुन मला आयुक्त यशवंत डांगे यांनी विनाकारण कोणतेही सबळ पुरावे नसतांना व तसेच आवश्यक त्या नियमा प्रमाणे कारवाई न करता मन मर्जीने मला सक्तीच्या रजेवर पाठविले.

त्याबाबत मी विनंती करुनही पदावर काम करु दिले नाही. बेकायदेशिर रित्या सक्तीच्या रजेवर जाण्यास भाग पाडले. सदरचे सक्तीच्या रजे बाबतचा आदेश रद्द करण्यासाठी मी मा. प्रधान सचिव नगर विकास विभाग यांना लेखी अर्ज केलेला आहे. दरम्यान, प्रभारी वैदयकिय अधिकारी डॉ. सतिष राजुकरकर यांच्यासह आयुक्त यशवंत डांगे यांनी पुर्वग्रहदुषीत हेतुने कोतवाली पोलीस ठाण्यात खोटा फौजदारी गुन्हा दाखल केला. चुकीचा व बनावट गुन्हा दाखल करुन अनेक दिवस अटक करुन जेलमध्ये ठेवण्यास सदर इसमांनी भाग पाडले आहे. संबंधितांनी कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ. बोरगे यांनी एसपींना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...

सिस्पेतील चोरांना पाठीशी घालणारा मोर कोण?; डॉ. विखेंनी साधला खा. लंकेंवर निशाणा

ठेवीदारांच्या पैशासाठी उपोषण का केले नाही? नामोल्लेख टाळत थेटपणे खा. नीलेश लंके यांच्यावर निशाणा...

राजे शिवाजी पतसंस्थेत ८१ कोटी २५ लाखांचा झोल; ४६ जणांची यादीच आली समोर

अपहारास जबाबदार असणार्‍या ४६ जणांची यादीच आली समोर | संचालक मंडळाला आझाद ठुबेने फाट्यावर...