spot_img
आरोग्यHealth: वरदानच! 'या' फळांचे पाने ही आरोग्यवर्धक, आजारासाठी ही फायदेशीर ? पहा..

Health: वरदानच! ‘या’ फळांचे पाने ही आरोग्यवर्धक, आजारासाठी ही फायदेशीर ? पहा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
बदलत्या मौसमात आरोग्याची काळजी घेणे गरजेची आहे. उत्तम आरोग्यसाठी योग्य अहार पण महत्वाचा आहे. ज्यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात, हिवाळ्यात पेरू, संत्री यासारखी फळे खाण्यात एक वेगळाच आनंद असतो.अनेकांना गोड पेरू आणि काळे मीठ याचे वेड असते. तुम्हाला माहित आहे की पेरूच नाही, तर त्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत
पेरूच्या हिरव्या पानांमध्येही भरपूर व्हिटॅमिन सी असते. या फळाची पाने रोज योग्य प्रमाणात चघळल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. याशिवाय पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स देखील असतात, जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी पेरूची पाने चावा.

सर्दी आणि फ्लूची लक्षणे
पेरूच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे आपल्याला सर्दी किंवा फ्लूपासून वाचवतात. या गुणामुळे ही पाने शरीरातील सूज कमी करण्याचे काम करतात. सर्दी-खोकला किंवा वारंवार त्रास होत असल्यास पेरूच्या पानांचे पाणी प्यावे.

वजन कमी करण्यास मदत करते
पेरू आणि त्याच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते. फायबर शरीरात कॉम्प्लेक्स स्टार्चचे साखरेत रूपांतर करत नाही. याशिवाय या फळाची पाने खाल्ल्याने चयापचय क्रियाही वाढते. तुमचे वजन कमी होत असेल, तर पेरूच्या पानांना तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा.

मधुमेहवर नियंत्रण
पेरूच्या पानांमध्ये रक्तातील साखर कमी करण्यासाठी प्रभावी संयुगे असतात. या कारणास्तव हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही ते रिकाम्या पोटी प्यायले तर तुम्हाला एकाच वेळी अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...