spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसला जबर धक्का! ठाकरे भाजपचा झेंडा हाती घेणार, राजकारण फिरणार?

काँग्रेसला जबर धक्का! ठाकरे भाजपचा झेंडा हाती घेणार, राजकारण फिरणार?

spot_img

Maharashtra Politics News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला लागलेली गळती अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. विदर्भातील काँग्रेसचा पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या मोर्शी मतदारसंघातून आता भाजपला मोठा राजकीय बूस्ट मिळण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे येत्या शनिवारी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पक्षप्रवेश वरुड येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या प्रवेशामुळे उत्साहाचं वातावरण आहे. विक्रम ठाकरे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली होती. महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज होते. या पार्श्वभूमीवर त्यांचा काँग्रेसपासून दुरावा वाढत गेला.

गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती, आणि ती आता प्रत्यक्षात येणार आहे. विक्रम ठाकरे यांच्या प्रवेशामुळे मोर्शी आणि वरुड मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद वाढेल, अशी अपेक्षा भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे. ठाकरे कुटुंबाचा स्थानिक राजकारणात ठसा असल्याने, भाजपला आगामी निवडणुकांमध्ये या भागात फायदा होऊ शकतो.

दुसरीकडे, काँग्रेससाठी ही घटना एक मोठा धक्का मानली जात आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते भाजपवर ‘भाजप म्हणजे फोडाफोडीचे राजकारण’ असे आरोप करत असले, तरी प्रत्यक्षात गळती रोखण्यात अपयश आलेले दिसते. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड निर्णायक ठरू शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

न्यू इंग्लिश स्कूल चापडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वितरण

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्या अंतर्गत आज...

सोमवारपासून वाळवणेत तरूणाचे रस्त्यासाठी उपोषण

माजी ग्रामपंचायत सदस्याची रस्त्यासाठी स्टंटबाजी - सरपंच संगिता दरेकर सुपा / नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील मौजे...

पारनेर – विसापूर रस्त्यावर बाबुर्डी येथील पुलावर मोठा खड्डा; अपघाताचा धोका वाढला

  सुपा / नगर सह्याद्री गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील पारनेर - विसापूर रस्त्यावर बाबुर्डी...

मैत्री महागात पडली; तरुणीवर अत्याचार, केडगावमधील युवकाचा प्रताप, वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून एका...