spot_img
अहमदनगर'नदीकाठच्या गावातील नागरिकांना मोठे आवाहन' मुळा धरणातुन...

‘नदीकाठच्या गावातील नागरिकांना मोठे आवाहन’ मुळा धरणातुन…

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री: –
मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता २६ टीएमसी एवढी असुन आजघडीला धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार लोअर गाईड व अप्पर गाईड कर्व्हनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज सोमवार १२ ऑगस्ट रोजी दूपारी ३ वाजता मुळा धरणातून २ हजार यूसेसने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असुन मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

भंडारदरा पाणलोटात पावसाचे प्रमाण वाढले
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल रविवारी शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढल्याने ११०३९ दलघफू क्षमतेचे हे धरण आज-उद्या पूर्ण क्षमतेचे भरण्याची शयता आहे. काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा १०५९९ दलघफू झाला होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने ३१ जुलैला भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले होते. पाणी पातळी कायम ठेऊन येणारी आवक विसर्ग सोडण्यात येत होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...