spot_img
ब्रेकिंग..'ती' माहीती जनतेपुढे कणखरपणे मांडा! खासदार विखेंचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

..’ती’ माहीती जनतेपुढे कणखरपणे मांडा! खासदार विखेंचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

spot_img

राहुरी। नगर सहयाद्री-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहीती जनतेसमोर मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे गुहात कार्यकर्त्यांची संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खा.विखे यांचे मोटार सायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. विखे पाटील बोलत होते.

खा.विखे म्हणाले की, केलेले काम आपण जनतेत जावून सांगत आहोत. कारण वर्षानुर्षे समाजासाठी काम करण्याची परंपरा विखे पाटील परीवाराची आहे. सुसंसकृत राजकारण आजपर्यत झाल्यामुळे जनतेचे पाठबळ सातत्याने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीला साथ देण्याची मतदारांची भूमिका ठाम असल्याने महायुती करीता ही निवडणूक फक्त मताधिक्यासाठी उरली असल्याचे विखे पाटील म्हणाले.

समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आपण उतर शोधले आहे. दुधाचे अनुदान शेतकार्यांच्या खात्यात वर्ग झाले. अनुदानापासून कोणीही वंचित राहाणार नाही याची काळजी घेतली जाईल आशी ग्वाही देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निर्णयाची योजनांची माहीती गावात आणि आपल्या बुथवर देण्याचे आवाहन करून आपले गाव आणि बुथ याचाच विचार करा असे आवाहन खा.विखे यांनी केले.

राहुरी तलुक्यातील जनता सूज्ञ आहे. विखे पाटील परीवाराला नेहमीच या तालुक्याने पाठबळ दिले. एक परीवार म्हणून या तालुक्याकडे आपण पाहातो. मागील पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा सर्वाच्या समोर आहे. निळवंडे धरणाचे पाणी देण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केला. अद्यापही काही काम बाकी आहेत ही काम महायुती सरकारच पूर्ण करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...