अहमदनगर | नगर सह्याद्री:-
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणार्या आरोपीस कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले आहे. चेतन संतोष सरोदे (रा. गांधी नगर, बोल्हेगाव, ता. जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २७ सप्टेंबर २०२४ रोजी पिडीत मुलीच्या आईने कोतवाली पोलीसांना अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची माहिती दिली.
मुलगी २६ रोजी दुपारी बुरुडगाव रोड येथे अभ्यासा विषयी झेरॉस काढण्यासाठी कॉलेज च्या बाहेर आली होती. त्यावेळी आरोपी चेतन संतोष सरोदे हा दुचाकीवर फिर्यादीच्या पाठीमागुन आला व शिवीगाळ केली. बळजबरीने गाडीवर बसवुन बोल्हेगाव येथे घेऊन जात मारहाण करुन अत्याचार केला. तु कोणाला सांगितले तर तुझे फोटो तुझ्या घरी व कॉलेज मध्ये व्हायरल करेल, तुला जीवे मारेल अशी धमकी दिली. यावरुन फिर्याद दाखल झाल्याने पोलिस निरक्षिक प्रताप दराडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हेशोध पथकास सदर गुन्हयाबाबत माहिती देवून आरोपी व पिडीत मुलीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने तपास करुन आरोपी चेतन संतोष सरोदे यास त्याचे मामाचे गावी भानसहिवरा ता. नेवासायेथुन ताब्यात घेवुन सदर मुलीची सुटका केली. पुढील तपास म.पो.स.ई शितल मुगडे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधीकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, म.स.पो.नि योगिता कोकाटे, म.पो.स.ई. शितल मुगडे गुन्हे शोध पथकाचे म.पो.हे. कॉ रोहिणी दरंदले पो.हे.कॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सुर्यकांत डाके, पो.कॉ अमोल गाढे, अभय कदम, सतीश शिंदे अतुल काजळे मपोकों सोनल भागवत व दक्षिण मोबाईल सेल चे पो.कॉ राहुल गुंडू यांनी केले आहे.