spot_img
ब्रेकिंगविधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांचे मोठे विधान; राज्यर्त्यांना त्याची..

विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांचे मोठे विधान; राज्यर्त्यांना त्याची..

spot_img

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:-
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पलटवार केला आहे.अमित शाह यांनी शरद पवार हे देशभरातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना पवार यांनी शाह यांच्या तडीपारीचा उल्लेख केला. ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं आहे. त्याच्या हातात देशाचं गृहमंत्रीपद आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार यांनी हा हल्ला चढवला. शरद पवार यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अमित शाह होम मिनिस्टर आहेत. अमित शाह म्हणाले की, देशातील जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्याचे सरदार शरद पवार आहेत. अमित शाह आधी गुजरातचे मंत्री होते. तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना गुजरातमधून तडीपार केले होते. ज्या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केले होते. तो माणूस आज देशाचे गृहमंत्रीपद सांभाळतोय. देशाचं संरक्षण करतोय, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला.

माझा बोटांवर माझा विश्वास
यावेळी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी मी शरद पवार यांचे बोट पकडून राजकारणात आलोय, असे आपल्या भाषणात म्हटले. टोपे यांच्या या विधानवर शरद पवार यांनी कोटी केली. ते म्हणाले, टोपे म्हणतात की, ते माझे बोट पकडून राजकारणात आले. पण मी त्यांच्या मताशी सहमत नाही. कारण एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका भाषणात मी शरद पवार यांचे बोट पकडून राजकारणात आलोय असे म्हटले होते. पण मी कुणाच्याही हातात माझे बोट देत नाही, देणार नाही. कारण माझ्या बोटावर माझा पूर्ण विश्वास आहे, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार कालपासून छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, आगामी विधानसभा निवडणुका, पक्षाच्या रणनिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विधानसभेला लोकसभेसारखा निकाल लागणार का? याबाबत सर्वात महत्वाचे विधान केले.

काय म्हणाले शरद पवार?
“मराठा आरक्षणासंबंधी मतभेद असण्याचे कारण नाही. मात्र दोन वर्गांमध्ये एक प्रकारचे अंतर वाढते की काय याची मला काळजी आहे, अशी स्थिती मला दिसते. विशेषतः मराठवाड्यातील दोन तीन जिल्ह्यांमध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं मला वाटत. मला काहींनी सांगितलं की विशिष्ट समाजाच्या हॉटेलमध्ये काही वर्ग जात नाही, हे चिंताजनक आहे, हे बदलण्यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर प्रयत्न करावे लागतील,” असं शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणावर भूमिका काय?
तसेच “मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा असा आमचा आणि माझ्या पक्षाचा आग्रह आहे. सर्वांशी सुसंवाद करुन मार्ग काढावा, अशी आमची भूमिका आहे, असं शरद पवार म्हणाले. तसेच रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर यावे. ज्यांची ज्यांची योग्य रस्त्यावर येण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागत आहे,” असे म्हणत शरद पवार यांनी पक्षातील इनकमिंगबाबत महत्वाचे विधान केले.

विधानसभेच्या निकालावर मोठे विधान!
“तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. लोकांना बदल हवा आहे. आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे, उद्याच्या निवडणुकीत आपल्याला संधी आहे, पण लोकसभेला निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही जे एकसंघ चित्र उभं केलं. ती प्रक्रिया पुर्ण झाली त्याला मूर्त स्वरुप देण्याची गरज आहे. तसे मुर्तस्वरुप आले तर लोकसभेसारखा निकाल दिसेल अन्यथा राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल,” असे मोठे विधान शरद पवार यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...