spot_img
अहमदनगर'सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप'

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

spot_img

निघोज । नगर सहयाद्री
जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप तसेच वृक्षारोपण करीत शेळके साहेब यांना उपस्थीतांनी आदरांजली व अभिवादन केले. यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय नेतेमंडळी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेळके साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पिंपरी जलसेन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले .

मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रभाकर कवाद या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . यावेळी शेळके साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सर्वाधिक वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच या परिसरातील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी या झाडांचे संगोपन करण्याची ग्वाही यावेळी दिली. पिंपरी जलसेन हा परिसर निसर्गरम्य असून गेली सहा ते सात वर्षात या परिसरात विविध ठिकाणी वीस ते पंचवीस हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले असून याचे संगोपन सामुहीकरित्या करण्यात आले आहे.

गुरूवार दि. २५ रोजी या ठिकाणी नागालॅंड येथील सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने येथील पाणी अडवा पाणी जिरवा तसेच वृक्षारोपण याची पाहाणी करीत या प्रकल्पाच्या सर्वेसर्वा गीतांजली शेळके व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच ग्रामस्थांचे विषेश कौतुक केले. या वेळी श्रीमती शेळके यांनी पिंपरी जलसेन गावाला मिळालेल्या पुरस्कारांची माहिती देत जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांचा आशिर्वाद व प्रेरणा तसेच जिल्हा सहकारी बँकेचे व जी एस महानगर बॅंकेचे माजी अध्यक्ष तसेच संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. उदय दादा शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे काम करण्यात आले असून ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते यांनी जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व उदयदादा शेळके यांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून त्यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. माजी मंत्री व संत निळोबाराय पालखी सोहळा समीतीचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले की उदय दादा यांनी तालुक्यातील राजकारणात सक्रिय होण्यासाठी आम्ही सर्वांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी वीस वर्षांपूर्वी चर्चा केली दादांनी लगेच मान्यता देऊन जिल्हा सहकारी बँकेचे संचालकपदाची निवडणूक लढवीण्याची सुचना त्यांनी उदय दादा यांना केली. आज शेळके साहेब व उदय दादा आपल्यात नाहीत मात्र त्यांनी केलेले काम आणी विकासाचा विचार आपल्या बरोबर असलयाचे त्यांनी सांगीतले.

आज राज्यातील हजारो कुटुंबे उभे करीत लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे योगदान सर्वाधिक असून गीतांजली शेळके यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही सावंत यांनी उपस्थीतांच्या वतीने दिली. बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष वसंत कवाद यांनी यावेळी सांगितले उदय दादा शेळके फौंडेशनच्या माध्यमातून परिसरात वृक्षारोपण हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यावर्षीच्या तापमानाचा विचार केला तर तापमान सर्वाधिक होते यासाठी गावोगावी वृक्षारोपण व त्यांचे संगोपन महत्वपूर्ण आहे. गीतांजली ताई शेळके यांनी गेली सहा वर्षांपूर्वी या ठिकाणी वृक्षारोपण करुण गाव आदर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.

या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम यशस्वी होऊन गावाला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करुन राज्याचे नाव देशात झाले आहे. जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व उदय दादा शेळके यांनी सर्वसामान्य जनतेला आधार देऊन राज्यातील औद्योगिक विकासासाठी मोठे योगदान दिले असून गीतांजली ताई शेळके व शेळके परिवार यांचे सामाजिक योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन यावेळी कवाद यांनी व्यक्त केले आहे. दिपक आण्णा लंके यांनी यावेळी सांगितले की जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व उदयदादा शेळके यांचे बॅंकींग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान असून त्यांनी सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे. गीतांजली शेळके यांनी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून तसेच जिल्हा सहकारी बँक व जी एस महानगर बॅंकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पाठबळ दिले असून शेळके साहेब यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांनी सांगितले की, शेळके साहेब यांनी सॉलिसिटर माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे. बॅंकींग चळवळीत त्यांचे योगदान मोठे आहे. उदय शेळके यांनी शेळके साहेब यांचे अनुकरण करताना जी एस महानगर बॅंकेची मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. त्यांचा वारसा समर्थपणे चालवण्याची जबाबदारी गीतांजली शेळके व त्यांचा सर्व परिवार समर्थपणे चालवीत असून समाजासाठी सर्वाधिक योगदान देणारे शेळके परिवार म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे कवाद यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा सहकारी बँक व जी एस महानगर बॅंकेच्या संचालिका तसेच संजीवनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते, दिपक लंके, भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, कान्हूरपठार पतसंस्थेच्या चेअरमन सुशिलाताई ठुबे,बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, माजी सभापती गणेश शेळके, माजी सभापती गंगाराम बेलकर, संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सावंत, नीलेश लंके फौंडेशनचे राज्याचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे उपसभापती बापू शिर्के, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, पिंपळगाव रोठा येथील देवस्थानचे पदाधिकारी अशोकराव घुले, डॉक्टर कावरे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद झावरे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, पत्रकार भाऊसाहेब चौरे, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे, गांजीभोयरे गावचे माजी सरपंच आबासाहेब खोडदे, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, निघोजचे माजी सरपंच ठकाराम लंके, किशन कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शिवाजीराव लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, माजी सरपंच लहू थोरात, जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त तालुका विकास अधिकारी भालेकर साहेब, गांजीभोयरे सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब खोडदे, शिवाजी औटी, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, वडझीरचे माजी सरपंच बाळासाहेब दिघे, नानपाटील लंके, सुभाष खणकर, तुकाराम कदम, ज्येष्ठ नेते नानाभाऊ मावळे, माजी सरपंच सुभाष खोसे, जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे, समीर पठाण, वडझिरे सोसायटीचे माजी उपाध्यक्ष चौधरी सर, आण्णासाहेब मोरे, आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण, सामाजिक कार्यकर्ते दिलीप ढवण, शिरुर येथील व्यवसायीक राजेंद्र लामखडे, मुंबई येथील व्यवसायीक राजूशेठ वराळ, मुंबई येथील व्यवसायीक मच्छिंद्र लंके, बाळासाहेब लामखडे, भिवा रसाळ, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, पारनेर तालुका फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारी जयसिंग हरेल, पिंपरी जलसेन सरपंच सुरेश काळे, उपसरपंच वर्षा पानमंद, विठ्ठल आडसरे, दादाभाऊ बोरुडे, निवृत्ती आडसरे, माजी सरपंच भाऊसाहेब पानमंद तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पिंपरी जलसेन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक लहू थोरात व मुंबई बॅंकेचे अधिकारी सुभाष खणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पठारे यांनी केले शेवटी समीर पठाण यांनी उपस्थीतांचे आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...