spot_img
अहमदनगरकांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

spot_img

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले | देवेंद्रजी अन् अजितदादा लक्ष घालणार का?
कांदा बँकेच्या नावाखाली ‘च्युत्या’ बनविणार्‍यांच्या यादीत आता एकनाथ शिंदे | काकोडकर, शरद पवार यांच्यानंतर ढोकणेच्या गळाला एकनाथ शिंदे सरकार
सारिपाट / शिवाजी शिर्के
अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणुक करण्याचा आणि कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना फायदा होणार असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असला तरी संपूर्ण फसवा आहे. राहुरीतील हिंदुस्थान अ‍ॅग्रो ही कंपनी जे भारत ढोकणे नावाचे सदगृहस्थ चालवतात त्यांनी याच कंपनीच्या माध्यमातून अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत याआधी याच विकिकरण प्रक्रियेच्या नावाखाली शब्दश: ‘च्युत्या’ बनविले आहे. आता याच भारत ढोकणेच्या गळाला एकनाथ शिंदे लागले आहेत आणि च्युत्यांच्या यादीत ढोकणे याने एकनाथ शिंदे यांना टाकले इतकेच! हे सारे होत असताना देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार या दोघांना याच भारत ढोकणेचे उपदव्याप माहिती असूनही ते यात गप्प कसे असा प्रश्न जनतेला पडला आहे. ढाकणे याने लाखो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये लाटले. हिंदुस्थान अ‍ॅग्रोच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला अन् मुळा धरणात शार्क माशाचा प्रयोग या नावाखाली शासनाला लुटले. आता त्याच ढोकणे यांंच्या हिंदुस्थान अ‍ॅग्रोच्या नावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला ‘च्युत्यात’ काढत तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे.

नगर जिल्ह्यातील कांद्याचे वाढते उत्पादन आणि त्यातून पडणारा भाव विचारात घेता उत्पादीत होणारा कांदा अणुउर्जेच्या माध्यमातून विकिकरण प्रक्रिया करून साठवण करून ठेवायचा आणि उत्पादन घटल्यानंतर बाजारभाव वाढताच हा कांदा पुन्हा बाजारात आणण्याची ‘सुपिक आयडीया’ काही वर्षांपूर्वी भारत ढोकणे यांच्या डोक्यात आली. अत्यंत चलाख असणार्‍या या गृहस्थाने यासाठी अणुउर्जा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष व शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांची भेट घेतली. जाणता राजा म्हणून ओळख असणार्‍या तत्कालीन कृषीमंत्री असणार्‍या शरद पवार यांनाही हेच महाशय भेटले आणि कांद्यावर विकीकरणाची प्रक्रिया करून कांदा साठवून ठेवण्याची भन्नाट आयडीया याच भारत ढोकणे यांनी त्यावेळी मांडली.

विषयाच्या मांडणीत आणि बोलघेवड्यात पटाईत असणार्‍या याच भारत ढोकणे याने त्याचवेळी रिझर्व बँकेकडून सहकारी बँक सुरू करण्याचा परवाना मिळवला आणि त्याने अभिनव सहकारी बँकेची स्थापना केली. नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्याने शाखा काढल्या. नगर शहरही त्यास अपवाद राहिले नाही. नगरमधील एक प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञही त्याच्या मोहात पडले. त्यांनाही त्याने बँकेत पदाधिकारी केले. मोठ्या प्रमाणात ठेवी मिळाल्यानंतर त्याच ठेवींच्या जोरावर याच भारत ढोकणे याने निवडणुकीची तयारी चालवली. पुढे जाऊन त्याने बँकेतील ठेवीदारांचे हे पैसे हिंदुस्थान अ‍ॅग्रो या कंपनीच्या स्थापनेसाठी लावले.

मुळा धरणाच्या आसपास त्याने शंभर एकरपेक्षा जास्त जमिन या कंपनीच्या नावाखाली खरेदी केली. कंपनीच्या नावाने शेतकर्‍यांकडून अत्यंत पडेल भावात जमिन मिळवताना या भारत ढोकणे याने काही शेतकर्‍यांना त्यांच्या मुलांना कंपनीत नोकरी देतो या नावाखाली मोबदला देखील दिल्या नसल्याच्या तक्रारी त्यावेळी झाल्या. मात्र, शरद पवारांपासून ते अणुशास्त्रज्ञ काकोडकर अशी सारीच मंडळी भारत ढोकणे याच्या प्रेमात पडलेली पाहून आता आपल्या मुलाबाळांना येथे रोजगार मिळेल अशी अपेक्षा स्थानिकांनी ठेवली आणि आपल्या जमिनी या कंपनीसाठी देऊ केल्या.

अभिनव बँकेतील ठेवीदारांचे पैसे कंपनीसाठी लावले आणि जोडीने केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान देखील लाटले. ही कंपनी सुरूच झाली नाही. अणुकिरणांचा वापर करणारा ‘अभिनव’ प्रयोग म्हणून त्यावेळी देशभरातील मिडियाने याच कंपनीचे आणि भारत ढोकणे याचे कौतुक केले.कौतुक सोहळ्याची त्यावेळच्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियात जणू स्पर्धाच लागली होती. दरम्यान, काही महिन्यांचा कालावधी जाताच अभिवन बँकेतील ठेवीदारांना त्यांची ठेव मिळेनाशी झाली. ठेवीदार रस्त्यावर आले. आंदोलने झाली. पोलिसांकडे निवेदने गेली. अनेकजण ठेव मिळत नसल्याने हवालदिल झाले. काहींनी जीव गमावला. मात्र, ठेवी मिळाल्या नाहीत. त्या अभिनव बँकेचे आणि ठेवीदारांचे काय झाले या प्रश्नाचे उत्तर आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री या नात्याने देण्याची गरज आहे.

कांद्यावर प्रयोग करणारा हिंदुस्थान अ‍ॅग्रोचा प्रकल्प चर्चेत असताना भारत ढोकणे याने मुळा धरणात शार्क मासा सोडण्याचा प्रयोग केला. या शार्क माशाचे काहीच झाले नाही. धरणात शार्क माश्याचे पिल्लू देखील आले नाही. मात्र, या शार्कच्या नावाखाली याच भारत ढोकणे याने सरकारला गंडा टाकला. कांद्याची महाबँक काढण्याची सुपिक आयडीया ही एकनाथ शिंदे यांची की या भारत ढोकणे याची असा प्रश्न यानिम्मित्ताने उपस्थित होतो आहे. राज्य सरकारच्या बद्दल आधीच जनतेच्या मनात आणि विशेषत: शेतकर्‍यांच्या मनात प्रचंड नाराजी आणि चिड असताना ढोकणेला बळ देणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या पदरात नक्कीच काहीतरी पडले असणार अशी शंका आता येऊ लागली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदारांंनी या महाबँकेच्या प्रयोगाला विरोध केल्याचे दिसते. त्याऐवजी कांद्यावर लावलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी केले तर त्याचा फायदा नक्कीच शेतकर्‍यांना होणार आहे. वेळ अद्याप गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी राहुरीतील हा प्रयोग रद्द करण्याची गरज आहे. भारत ढोकणे याने अनेकांना ‘च्युत्या’ बनविले आहे, त्यात एकनाथराव तुमची भर पडू द्यायची की नाही हे तुम्हीच ठरवा! नसता, काही महिन्यांवर मतदान आले आहेच!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...