spot_img
अहमदनगर'बनावट कागदपत्रांद्वारे साडेआठ कोटींची फसवणूक' 'असा' घडला प्रकार?

‘बनावट कागदपत्रांद्वारे साडेआठ कोटींची फसवणूक’ ‘असा’ घडला प्रकार?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
बनावट कागदपत्र तयार करून बँकेच्या कर्ज प्रकरणात खरे आहेत असे भासविले. विश्वस्त मंडळात कोणताही ठराव नसताना बँकेत उघडलेल्या दोन्ही खात्यांचे सर्व अधिकार स्वतःकडे घेऊन बँकेच्या कर्ज प्रकारणासाठी जामीनदार करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी विश्वस्त अमित रसिकलाल कोठारी (रा. माणिकनगर, ता. जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून डॉ. राकेश कांतिलाल गांधी (रा. पाईपलाईन रोड, ता. जि. अहमदनगर) डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर, ता. जि. अहमदनगर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात साडे आठ कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, फिर्यादी रेंज फाउंडेशन सोसायटी तथा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या ट्रस्टमध्ये नऊ जणांचे सभासद मंडळ आहे. ट्रस्टच्या स्थापनेपासून डॉ. राकेश कांतिलाल गांधी हे अध्यक्ष आहेत. नोंदणीकृत संस्था असल्यामुळे संस्थेचा कारभार चालविण्याची जबाबदारी संस्थेच्या विश्वस्त मंडळाची आहे. या ट्रस्टच्या अधिपत्याखाली अनेक वर्षांपासून अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी सुरू आहे. त्याचा कारभार फिर्यादी अमित रसिकलाल कोठारी तसेच योगेश सुरेश बाफना पाहतात. डॉ. राकेश कांतिलाल गांधी, डॉ. आशिष अजित भंडारी, विजय माणिकराव निकम व बाबाजी हारजी करपे पाटील यांची सोसायटीचे विश्वस्तपदी निवड झाली असून या संस्थेचा नोंदणी क्रमांक महा/१८५/२०४ आहे. या संस्थेच्या अधिपत्याखाली साई एंजल स्कूल या नावाने (तवलेनगर, औरंगाबाद रोड, सावेडी) येथील त्यांच्या स्वतःच्या जागेत आहे. त्यांनी महाराष्ट्र बँक शाखा चितळे रोड यांच्याकडून कर्ज घेऊन ही शाळा बांधलेली आहे. या शाळेवरील बँकेचे कर्ज एनपीए मध्ये गेल्याने बँकेने कर्जाची वसुली सक्तीने चालू केली असल्याने आम्ही सर्वांनी पैसे जमा करून कर्ज मिटविले, असे फिर्यादी अमित रसिकलाल कोठारी यांनी म्हटले आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये साई एंजल स्कूलच्या दोन मजली बांधकामा करिता एचडीएफसी बँक, शाखा स्टेशन रोड या बँकेचे आठ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज प्रकरण करण्याचे डॉ. राकेश कांतिलाल गांधी व डॉ. अशिष अजित भंडारी व इतरांनी ठरविले. या कर्जापोटी रेज फाउंडेशन यांना जामीनदार म्हणून बँकेत द्यायचे असे आम्हाला सांगीतले. त्यास नकार दिला. याबाबत झालेल्या ठरावावर माझी, तसेच श्वेता अमित कोठारी, रसिक चंदुलाल कोठारी (मृत) यांनी सह्या केलेल्या नसतानाही डॉ. राकेश कांतीलाल गांधी, डॉ. अशिष अजित भंडारी यांनी आमची कोणतीही परवानगी, ठराव न घेता बँकेच्या कर्ज प्रकारणासाठी रेज फाउंडेशनला जामिनदार करून एचडीएफसी बँक, स्टेशन रोड, या बँकेचे आठ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर करून घेतले.

या प्रकरणात फिर्यादी व सभासदांच्या खोट्या सह्या करून खोटे कागदपत्र तयार करून ते बँकेच्या कर्ज प्रकरणात खरे आहेत असे भासविले. या प्रकरणाबाबत ट्रस्टच्या नियमाप्रमाणे कोणताही ठराव न घेता सर्व अधिकार डॉ. राकेश कांतिलाल गांधी व डॉ. आशिष भंडारी यांनी स्वतःकडे घेऊन ट्रस्टच्या नियमांचे उल्लंघन फिर्यादी व श्वेता अमित कोठारी, रसिक चंदुलाल कोठारी (मृत) यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसइ शीतल मुंगडे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...