spot_img
अहमदनगरवासुंदाच्या प्रफुल्ल झावरेंची गरुड भरारी! तेलुगु टायटनच्या माध्यमातून गाजवतोय कब्बडीचे मैदान

वासुंदाच्या प्रफुल्ल झावरेंची गरुड भरारी! तेलुगु टायटनच्या माध्यमातून गाजवतोय कब्बडीचे मैदान

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील वासुंदे येथील रहिवासी असलेल्या व कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट चढाई पटु नावलौकिक मिळविलेल्या प्रफुल्ल झावरे याने नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डी सिझन मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवत गरूड भरारी घेतली आहे. त्याच्या या यशाबद्दल आमदार नीलेश लंके यांच्यासह गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ झावरे, भागुजी झावरे, पोपटराव साळुंखे, रवींद्र झावरे, अमोल उगले यांनी सन्मान केला आहे.

परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या तुमच्याकडे कौशल्य, जिद्द व प्रचंड संघर्ष करण्याची कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकता हे कर्तुत्व सिद्ध केल आहे. पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील युवा कबड्डी खेळाडू प्रफुल्ल झावरे अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या खेळाडूने कबड्डी खेळात स्वतःच्या खेळाच्या जोरावर मोठे यश मिळविले आहे. नुकत्याच बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत, अहमदनगर जिल्ह्याला सुवर्णपदक मिळाले आहे.

क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सीरीज अंतर जिल्हा स्पर्धा युवा विंग २०२४ स्पर्धेतील यशात प्रफुल्ल सुदाम झावरे या युवकाचे मोठे योगदान आहे. सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून त्याची प्रभावी कामगिरी झाली आहे. स्पर्धेत रेड पॉइंट मिळवणारा प्रफुल्ल हा या पर्वातील एकमेव खेळाडू ठरला त्याच्या या कामगिरीमुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू म्हणून ५० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला व नगर जिल्हा संघाला वीस लाख रुपयाचा अजिंक्य पदाचा पुरस्कार मिळाला आहे.

पाच हजार रुपयाचा सुपर रेड स्पेशलिस्ट पुरस्कार तर बारा वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या खेळाडूने मिळवला आहे.१६ सामन्यात प्रफुल ने २०७ पॉईंट मिळवत सर्वोत्कृष्ट गुणांकन मिळविणारा खेळाडू ठरला. क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सीरीज आंतरजिल्हा स्पर्धा युवा विंग २०२४ मध्ये तो चमकला आहे स्टार स्पोर्ट वर होणार्‍या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत तेलगू टायटन संघातून खेळत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या व्यावसायिक स्पर्धेत दोन वेळेला सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून त्याला गौरविण्यात आले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या खेळाडूने आपल्या कडे असणारे चापल्याद्वारे स्पृहणीय यश मिळविले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...