spot_img
अहमदनगरनिघोजकर टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार? कारण काय..

निघोजकर टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार? कारण काय..

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रोत्सवास सोमवार दि.२२ एप्रिल पासून सुरवात होणार असून यात्रेसाठी कुकडी डावा कालव्याला पाणी न सोडल्यास लोकसभा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर निघोज ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याचा ईशारा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

’नगर सह्याद्री’ शी बोलताना लंके यांनी सांगितले की, राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या निघोज येथील मळगंगा देवीचा यात्रा उत्सव देवीला हळद लावण्याचा कार्यक्रम सोमवार दि.२२ एप्रिल पासून सुरू होत आहे. ८५ फुट उंचीच्या काठीची मिरवणूक मंगळवार दि.२३ रोजी तसेच देवीची मुख्य यात्रा दि.१ मे पासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी राज्यातून लाखो भावीक देवी दर्शनसाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र सध्या निघोज आणी परिसरात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

परिसरातील नदीला तसेच जलसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्याची मागणी कुकडी डावा कालवा नारायणगाव विभागाच्या अधिकार्‍यांकडे केली होती. मात्र फक्त दोन दिवस कमी क्षमतेने पाणी सोडून अधिकार्‍यांनी निघोज परिसरातील जनतेची खिल्ली उडविली आहे. जवळपास निघोज आणी पारनेर तालुक्यातील सोळा ते अठरा गावांसाठी दहा दिवसाचे आवर्तन देण्याची गरज असताना केवळ दोन दिवस पाणी दिल्याने पिण्याच्या पाण्यासाठी असलेले उदभव कोरडे ठाक पडले आहेत. नदीला पाणी नाही सर्व जलसिंचन बंधारे कोरडे आहेत अशी भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे.

उन्हाळा कडक आहे साधारण ३५ ते ३८ तापमान आहे. पाण्याची टंचाई सातत्याने जाणवत असल्याने गोधन सुद्धा संकटात सापडले आहे. अशातच मळगंगा देवीचा यात्रोत्सव जवळ आला आहे. पिण्यासाठी व भावीकांच्या स्वच्छतेसाठी किमान आठ दिवसाचे आवर्तन दि. १५ एप्रिल पासून सोडण्याची नितांत आवश्यकता असून पाणी न सोडल्यास निघोज ग्रामस्थ लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकतील असा ईशारा ज्ञानदेव लंके तसेच निघोज व मुंबईकर ग्रामस्थ यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...