अहमदनगर | नगर सह्याद्री
सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने तसेच आगामी गुडीपाडवा, रमजान ईद, महात्मा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी या सण, उत्सवांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भिंगार शहरासह मुकुंदनगर परिसरात पोलिसांनी शुक्रवारी (दि.५) सायंकाळी रूट मार्च काढला होता.
भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत मुकूंदनगर भागात इरिगेशन मस्जिद – बॉम्बे बेकरी – दरबार चौक – सहारा कॉर्नर -नगरी चहा – संभा टपरी चौक -फकीरवाडा रोड – वाबळे कॉलनी ते बॉम्बे बेकरी व इरीगेशन मस्जिद असा तसेच भिंगार शहरात पंचशिल कमान – खळेवाडी – नेहरु चौक – शिवाजी चौक – ब्राम्हण गल्ली – भिंगार वेस – गवळीवाडा – सदर बाजार असा रुट मार्च पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे अधिपत्याखाली घेण्यात आला.
या रुट मार्च मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय अधिकारी नगर शहर अमोल भारती, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु तसेच २ अधिकारी व ४० अंमलदार व बीएसएफ चे बटालीयन कमाडंट, डेप्युटी कमाडंट, असि.कमाडंट तसेच ५० जवान व यु आर टी प्लाटुन २५ जवान सहभागी झाले होते.