spot_img
अहमदनगर..म्हणून खातेदाराकडून शिपायाला मारहाण! नामांकित बँकेत धक्कादायक प्रकार?

..म्हणून खातेदाराकडून शिपायाला मारहाण! नामांकित बँकेत धक्कादायक प्रकार?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
खातेदाराकडून बँकेच्या शिपाईला मारहाण केल्याचा प्रकार शहरातील नामांकित बँकेत घडला आहे. याप्रकरणी श्रीनिवास रवींद्र अरकल (वय, ३१ वर्षे रा. नित्यसेवा सोसायटी पाईपलाइन रोड, अ. नगर ) यांच्या फिर्यादीवरून खातेदार नावेद सलमान शेख (रा. कोठला अ. नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: फिर्यादी शहरातील चौपाटी कारंजा परिसरात असणार्‍या एका नामांकित बँकेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. तर नावेद सलमान शेख हे बँकेचे खातेदार आहे. दि.५ एप्रिल रोजी चार वाजण्याच्या सुमारास बँकेची खातेधारकासाठी असलेली वेळ संपल्याने फिर्यादी यांनी बँकेचा दरवाजा बंद केला असता खातेदार बँकेत जाण्यासाठी आग्रह करत होता.

त्यावेळी फिर्यादी यांनी बँकेची वेळ संपलेली आहे तुम्ही उद्या पुन्हा या असे म्हणाल्याचा राग आल्याने खातेदाराने मुझे अभी अभी पैसे चाहीए मुझे कुछ पता नही असे म्हणून फिर्यादीस मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; वादग्रस्त मोहोळ विरुद्ध राक्षे लढतीची चौकशी होणार

योगेश दोडके यांची माहिती / प्रा.विलास कथुरे यांची प्रमुखपदी नियुक्ती अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरमध्ये...

तब्बल १९ बोगस कंपन्यांमधून कोट्यवधी लुटले; मोबाईल चालू तरी पोलिसांना सापडेना संदीप अन् त्याची टोळी…

 पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकाच संशयास्पद स्पेशल रिपोर्ट / शिवाजी शिर्के - सह्याद्री मल्टीनिधी ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत...

शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक!

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च २०२५ पासून...

‘सुपा, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सुपा, पारनेर, बेलवंडीत परिसरात घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोरांना, स्थानिक गुन्हे...