spot_img
ब्रेकिंगराज्यावर हवामानाचे दुहेरी संकट! अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा तर 'या' जिल्ह्यांना पावसाचा...

राज्यावर हवामानाचे दुहेरी संकट! अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा तर ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
राज्याला सध्या दुहेरी हवामाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. राज्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली असून अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने उष्णतेची लाट वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावासाचा अलर्ट हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत असून शुक्रवारी (दि.५) रोजी सोलापूर जिल्हात सर्वांत जास्त उच्चांकी कमाल तापमान ४३.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. विदर्भ व मराठवाड्यात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागली आहे. दरम्यान, पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपिटीचा, तसेच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

.हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असेल त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी सोलापूर जिल्हा देशभरात सर्वाधिक तापमान असणार्‍या शहरांच्या यादीत नोंद झाली आहे.

वातावरणात बदल?
रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वार्‍यामुळे विदर्भात रविवारी आणि सोमवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भापासून, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून, उन्हाच्या झळा, उकाडा कायम आहे. रात्री उष्ण ठरत असून, पावसाला पोषक हवामान होत आहे.

कालचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३९.६, अहमदनगर ३८.८, जळगाव ३७.९, धाराशीव ४०.६, छत्रपती संभाजीनगर ३९.४, कोल्हापूर ४०.२, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४०.८, नाशिक ३७.२, सांगली ४१, सातारा ३९.७, सोलापूर ४३.१, मुंबई ३२.५ ,अलीबाग ३४.१, परभणी ४१.४ , बीड ४१.५, अकोला ४१.८, अमरावती ४०.६, बुलडाणा ३७.५, ब्रह्मपुरी ४२, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०.३, नागपूर ४१.४, वर्धा ४२.१, यवतमाळ ४२. रत्नागिरी ३३.५, डहाणू ३५.५

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...