spot_img
अहमदनगरशिक्षक कॉलनीत 'धक्कादायक' प्रकार? व्यापार्‍याच्या घरात घडलं असं काही..

शिक्षक कॉलनीत ‘धक्कादायक’ प्रकार? व्यापार्‍याच्या घरात घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापारी कुटुंबाचे घर फोडून चार लाखाची रोकड, सहा लाख १८ हजार ७५० रूपयांचे सोन्याचे दागिने, ३० हजाराचे चांदीचे दागिने असा एकुण १० लाख ४८ हजार ७५० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ३ मार्च रोजी दुपारी १२ ते ६ मार्च रोजी केडगाव उपनगरातील मोहिनीनगरच्या शिक्षक कॉलनीत ही घटना घडली.

याप्रकरणी काल, गुरूवारी व्यापारी जितेश राजेंद्र बलदोटा (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांची पत्नी ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते.

जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. त्यानंतर चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली चार लाखाची रोकड, सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा ऐजव चोरून नेला.

सदरचा प्रकार ६ मार्च रोजी सायंकाळी फिर्यादीचा मोहिनीनगरमध्ये राहणार्‍या भावाच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी फिर्यादीला माहिती दिली. फिर्यादी व त्यांची पत्नी रात्री नऊच्या सुमारास घरी आल्यानंतर याबाबतची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...