spot_img
अहमदनगरनगरकरांना आता पाणी मोजून..! मनपाच्या १ हजार ५६० कोटींच्या अंदाजपत्रकात नेमकं काय?...

नगरकरांना आता पाणी मोजून..! मनपाच्या १ हजार ५६० कोटींच्या अंदाजपत्रकात नेमकं काय? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत १ हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सूचविली नाही, परंतु महापालिका नगरकरांना मोजून पाणी देणार आहे. त्यासाठी नळांना मीटर तर उपनगरांसाठी स्वतंत्र भूयारी गटार देणार आहे.

प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी एक हजार ४०० कोटी ९१ लाखांचे मुळ अंदाजपत्रक प्रशासकीय स्थायी समितीला सादर केले. स्थायीने त्यात वाढ सूचवून एक हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. महासभेने त्यास मंजूरी दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, डॉ. सचिन बांगर, प्रभारी उपायुक्त सपना वसावा, नगरसचिव मेहेर लहारे, मुख्यलेखाधिकारी डॉ. सचिन धस, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, शहर अभियंता मनोज पारखे, नगर रचनाकार राम चारठणकर, जल अभियंता परिमल निकम, राकेश कोतकर, श्री साळी, अनिल लोंढे, सुधाकर भुसारे, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. जावळे यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात शहर विकासासाच्या दृष्टीने भरीव तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न ४३० कोटी ८ लाख, तर भांडवली जमा एक हजार ५० कोटी ८ लाख अपेक्षित आहे. तसेच महसूली उत्पन्नात संकलित करापोटी १०३ कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील चौकांचे लोकसहभागातून सुशोभिकरण, महापालिका शाळांचे डिजीटलायझेशन, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, उद्यानांची दुरूस्ती अशा विविध सेवा- सुविधांवर अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे.

असे आहे अंदाजपत्रक
महसुली उत्पन्न – ४३० कोटी ८२ लाख
भांडवली जमा – १०५० कोटी ८ लाख

प्रमुख खर्च (कोटीत)
वेतन व भत्ते – १६९
पेन्शन – ४९
पाणीपुरवठा वीजबिल – ३६
पथदिवे वीजबिल – ६
शिक्षकांचे वेतन – ७
कचरा संकलन – २
टँकरने पाणीपुरवठा – ३
वाहन खरेदी – १
नवीन रस्ते – ५०
रस्ते दुरूस्ती – ४
पुतळे बसविणे – २

नगरकरांंवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही. अंदाजपत्रक सादर करताना सेवा- सुविधांवर भर देण्यात आलेला आहे. उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना, मीटरद्वारे पाणीपुरवठा, चौकांचे सुशोभिकरण, चांगले रस्ते यासारख्या सुविधांसाठी अंदाजपत्रकात तरतूद आहे.
-डॉ. पंकज जावळे, आयुक्त

नळांना बसणार मीटर
शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यात अनधिकृत नळजोडांची संख्या समोर येणार आहे. नळांना मीटर बसविण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. मंजूरनंतर प्रत्येक नळाला मीटर बसविण्यात येणार आहे. त्यातून मोठी पाणी बचत होणार आहे.

दीडशे कोटींचे कर्ज
पाणीपुरवठ्यासाठी सुमारे ४९५ कोटी रूपयांच्या योजना प्रस्तावित आहेत. या योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहेत. त्यात महापालिकेला स्वःहिस्सा भरावा लागणार आहे. त्यासाठी दीडशे कोटी रूपये कर्ज घेण्यात येणार आहे. अमृत योजनेंतर्गत उपनगरात भुयारी गटार योजना (फेज २) राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटींची तरतूद आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...