spot_img
अहमदनगरआमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश! 'ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा सेंटर मंजूर'

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश! ‘ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा सेंटर मंजूर’

spot_img

संगमनेर । नगर सह्याद्री
आमदार सत्यजीत तांबेंच्या पुन्हा एकदा प्रयत्नांना यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी मिळाली आहे. २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली होती. आता या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून हिरवा कंदिल दिला असून पुणे – नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणार आहे.

३० खाटांच्या या नियोजित ग्रामीण रुग्णालयासाठी शासन स्तरावरून स्वतंत्र पदनिर्मिती देखील केली जाणार आहे. राज्य सरकारच्यावतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून बोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली. बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण आवारात ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येईल. त्यासाठी जागा अधिग्रहण, नवीन इमारत बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर तसेच बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर यांना मंजूरी मिळाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल. बोटा येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मंजूरी बाबत सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मनापासून आभार मानतो, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...

औरंगजेबाची कबर हटवा; बजरंग दल मैदानात!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- वर्तमान राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर...

..म्हणुन बीडमधील परिस्थिती खराब; शरद पवार यांनी साधला धनंजय मुंंडेंवर निशाणा!

Politics News: बीडमधील सध्याची परिस्थिती आणि तेथील वाढत्या गुन्हेगारीवरून शरद पवार यांनी तेथील राजकारण्यांवर...

धक्कादायक! विवाहितेवर अत्याचार करत ‘तसले’ व्हिडीओ पतीला पाठविले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे....