spot_img
ब्रेकिंग...तर निवडणुका होणारच नाही!! ‘सगेसोयरे’ आणि 'तो' प्रश्न गंभीर; जरांगे पाटील यांचा...

…तर निवडणुका होणारच नाही!! ‘सगेसोयरे’ आणि ‘तो’ प्रश्न गंभीर; जरांगे पाटील यांचा पुन्हा इशारा

spot_img

आंतरवली सराटी | नगर सह्याद्री
Maratha Reservation: समाजाला दोन्ही द्यावे, जे आरक्षण दिले ते आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करून ओबीसीही द्यावे, अशी मागणी आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी केली. तसेच आरक्षणाचा मुद्दा गंभीर असल्याने यावेळी निवडणुका होणारच नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, शांततेत आंदोलन करुन देखील दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत. अंतरवाली सराटीमधील महिलांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती. त्या केसेस मागे घेता येतात का, हे सरकारने पाहावे. हैदराबादचे गॅझेट शिंदे समिती स्वीकारु शकते, मुंबई सरकारचे गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट स्वीकारायला हवे होते. लोकांना सांगण्यासारखं तुम्ही काय केलं, अधिसूचना काढून अंमलबजावणी केली नाही.

तुम्हाला तुम्ही मोठे समजत असाल, मात्र जनता नाही मानत. एकमेकाला दिले तर माणूस खूश होतो. सरकारने आरक्षण दिले पण अंमलबजावणी केली नाही. अधिसूचना काढली पण सगेसोयरेची अंमलबजावणी केली नाही. हे देऊन ते देखील दिले असते तर तुमच्या अंगावरील गुलाल १५ दिवस निघाला नसता. येत्या दोन दिवसात आपण पुढील निर्णय घेणार आहोत.

निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाही, ज्वलंत प्रश्न असल्याने सरकारच निवडणूक घेणार नाही. सगेसोयरेची अंमलबजावणी झाल्यावर निवडणूक घेतील, असेही जरांगे म्हणाले. सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी आमदारांनी पत्र दिली का? असा सवाल करत राजकारण्यांनी त्यांच्या डोयातील हवा कमी केली पाहिजे, असा सल्ला दिला.

मनोज जरांगेंचं ठरलं! पुन्हा आक्रमक मराठा आंदोलन; अशी असेल आंदोलनाची दिशा…
सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सगेसोयरेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी जरांगें पाटील यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. यावर अंमलबजावणी झाली नाही तर २४ फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात पुन्हा मराठा आंदोलन तिव्र करण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. तशा सूचना देखील मराठा कार्यकर्त्यांना केल्या आहेत.राज्य सरकारने मंगळवारी (२० फेब्रुवारी) विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे मात्र सगेसोयरे आणि ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

३ मार्चला आंदोलनाची गिनीज बुकमध्ये नोंद होईल?
मराठा आंदोलनाचे पोलिसांना दिलेले निवेदन कायम स्वरूपी असावं. मराठा समाजाने आंदोलन करताना आपल्या गावात करावं. स्वतःच्या हट्टसाठी हे आंदोलन करायचं नाही तर सरकारला जेरीस आणण्यासाठी करायचं आहे. महाराष्ट्र भर आदर्श रस्ता रोको झाला पाहिजे. वावर आपलं आहे, त्यातून रस्ता गेला असेल तर रास्ता रोको करायचा. सकाळी १०.३० वाजता आंदोलन सुरू होईल १ ते १.३० पर्यंत चालेल. मात्र पोलिसांची नोटीस आली तरी घाबरायंच नाही, परवानगी नाही दिली तरी आंदोलन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. ३ मार्चला संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात एकच रस्ता रोको आंदोलन होईल. जगातला सर्वात मोठा रस्ता रोको झाला पाहिजे, गिनीज बुकने यांची नोंद घेतली पाहिजे असं आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

पुन्हा गावबंदी?
दरम्यान मराठा समाजाकडून कडून पुन्हा गाव बंदी आणि निवडणुकावर बहिष्कार टाकण्याची मागणी, जरांगें पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. तसेच आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत मराठा समाजात आणि आंदोलकात चर्चा. आंदोलन करायचं आहेचं. तसंच तहसीलदार कार्यालयात जाऊन आपल्या नोंदी आपण शोधा. सगर्व मराठा समाजाने कुणबी नोंदींसाठी अर्ज करा, असं आवाहन मनोज जरांगें यांनी केलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...