spot_img
राजकारणअशोक चव्हाण भाजपमध्ये ! आता थेट राज्यसभेवर जाणार

अशोक चव्हाण भाजपमध्ये ! आता थेट राज्यसभेवर जाणार

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतील. ते भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समजली आहे. उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरतील.

कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे. आज दुपारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना हे मोठं गिफ्ट मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्ष घालवलेले,

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक, तसेच आमदारही त्यांच्यासोबत बाहेर पडले असून आज दुपारीच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्यासह माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजुरकर यांच्या समवेत नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक काँग्रेस पक्ष संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांचा आज भाजप प्रदेश कार्यालय येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पक्ष प्रवेश होणार आहे.

तसेच नाशिक आणि औसा मधील पदाधिकाऱ्यांचासुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होताच कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...