मुंबई / नगर सह्यादी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात आता अनेक घडामोडी होत आहेत. आता भाजप आणि मनसे युतीच्या सुरु झाल्या आहेत.
मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीसांसोबत बैठक झाल्याचं देशपांडे यांनी मान्य केलं असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
फडणवीसांसोबतची बैठक सदिच्छा भेट होती असं संदिप देशपांडे यांनी माध्यमांना सांगितलं. ‘आमच्यात विशेष अशी काही चर्चा झालेली नाही. बऱ्याच दिवसांपासून फडणवीसांना भेटायचं होतं. त्या दृष्टीनं आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
पुढेही असे प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेट नक्कीच होतील. एखाद्या व्यक्तीला भेटल्यास त्याचा काहीतरी अर्थ काढणं गरजेचं नाही. भेटीगाठी घेणं महाराष्ट्राचा इतिहास आहे. फडणवीसदेखील राज ठाकरेंना येऊन भेटतात. त्यामुळे आम्हीही त्यांना भेटलो,’ असं देशपांडे म्हणाले.