spot_img
अहमदनगर'साकळाई'च्या आराखड्याला मंजूरी देऊन कार्यारंभ आदेश द्या, अन्यथा रस्तारोको ; कृती समितीने...

‘साकळाई’च्या आराखड्याला मंजूरी देऊन कार्यारंभ आदेश द्या, अन्यथा रस्तारोको ; कृती समितीने नेमका काय दिला इशारा?

spot_img

सुनील चोभे | नगर सह्याद्री
साकळाई उपसा सिंचन योजनेचा आराखड्याला आठ दिवसांत अंतिम मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यात यावा, अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा साकळाई कृती समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन कृती समितीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.

गेल्या २५-३० वर्षापासून साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा संघर्ष चालू असून साकळाई योजनेचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ७९४ कोटींचा आराखडा तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपादन मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करू असे आश्वासन दिले होते.

आठ दिवसात आराखड्याला मंजुरी देऊन निधी वर्ग करावा अन्यथा लोकशाही मार्गाने १४ फेब्रुवारीला चिखली (कोरेगाव, ता. श्रीगोंदा) येथे सकाळी साडेनऊला नगर रोडवर जुना टोलनाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच रुईछत्तीसी येथे दि. १६ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता, नगर-सोलापूर रोड वर २५ फेब्रुवारीला दौंड-अहमदनगर रेल्वे लाईनवर सकाळी साडेनऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

निवेदन देतेवेळी कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेेंडे, समाजसेवक भापकर गुरुजी, संतोष लगड, नारायण रोडे, रामदाम झेंडे, पुरुषोत्तम लगड, रोहिदास उदमले, सुदाम रोडे, बापूसाहेब गाडेकर, शिवराम लंके आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...