spot_img
मनोरंजनPoonam pandey : प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेचे निधन, 'इतक्या' कोटींची संपत्ती सोडून...

Poonam pandey : प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेचे निधन, ‘इतक्या’ कोटींची संपत्ती सोडून गेली मॉडेल

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन झाले आहे. सर्वाइकल कॅन्सरने तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी रात्री तीच निधन झालं. पूनमने 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. poonam pandey

त्यापूर्वी ती मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती. सोशल मीडिया अकाऊंट्सवरील सेमीन्यूड फोटो आणि व्हिडीओमुळे ती सतत चर्चेत असायची. वयाच्या 32 व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला. तिच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पूनमची एकूण संपत्ती जवळपास 7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 52 कोटी रुपये इतकी आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात तिचा आलिशान अपार्टमेंट आहे.

या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे लग्झरी कारसुद्धा आहेत. तिच्याकडे असलेल्या BMW 5 सीरिजमधील सेडान कारची किंमत जवळपास 55 लाख रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास एक कोटी रुपये मानधन स्वीकारत असल्याची माहिती एका रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. 1 सप्टेंबर 2020 रोजी तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केले होते परंतु, अल्पावधीतच तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सॅमवर तिने धमकी आणि मारहाणीचा आरोप केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...