spot_img
अहमदनगरAhmednagar: श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी! वाळकी, पिंपळगाव माळवीत..

Ahmednagar: श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी! वाळकी, पिंपळगाव माळवीत..

spot_img

वाळकी, पिंपळगाव माळवीत भव्य सोहळा | ठिकठिकाणी कार्यक्रम

सुनिल चोभे | नगर सह्याद्री

श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवास आयोध्येमध्ये प्रारंभ करण्यात आला आहे. नगर तालुयातील वाळकी येथील श्रीराम मंदीरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा आयोध्येत होत असली तरी भव्यदिव्य सोहळा वाळकीत साजरा होणार आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट स्क्रीनद्वारे प्रक्षेपण होणार असून या नेत्रदिपक सोहळ्यास भाविकांनी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, श्री रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची नगर तालुक्यातील गावागावात जय्यत तयारी सुरु असून ठिकठिकाणी विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाळकी (ता. नगर) येथे प्रसिध्द व भव्य श्रीराम मंदीर आहे. वर्षभर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. येथील मुख्य उत्सव हा श्रीराम नवमी आणि गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यासाठी राज्यभरातून भाविक श्रीराम मंदीरात येत असतात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीत श्रीराम मंदीरास भेट देऊन श्रीरामांचे व वाळकीकरांचे दैवत समाधिस्त महेंद्रनाथजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दि. २२ रोजी श्रीराम मंदीरामध्ये भव्यदिव्य सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले.

येथील श्रीराम मंदीरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी नाथसेवा, नाथभक्त व श्रीराम भक्तांकडून सुरु आहे. दि . २२ रोजी मंदीरामध्ये सकाळी ८ वा. श्रीरामांच्या मुर्तीला अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर होमहवन, ११ वाजता श्रीराम चारित्रावर कथन आणि १२ वाजता अयोध्येतील सोहळ्याचे थेट स्कीनद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी वाळकीत भाविकांची मांदियाळी होणार असून सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम महोत्सवास उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथसेवेच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
२२ जानेवारी रोजी होणार्‍या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरासह नगरमध्येही जय्यत तयारी सुरु आहे. सोमवारी होणार्‍या या सोहळ्यासाठी गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर तालुक्यातील वाळकी व पिंपळगाव माळवी येथे असलेल्या श्री राम मंदिर मध्ये जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...