spot_img
महाराष्ट्रहापूस आला रे ! हंगामातील पहिली हापूसची पेटी पुण्यात दाखल, किंमत २१...

हापूस आला रे ! हंगामातील पहिली हापूसची पेटी पुण्यात दाखल, किंमत २१ हजार

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : आंबा हे फळ लहान थोरांपासून सर्वानाच आवडते. साधारण उन्हाळ्यात हे फळ भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये दाखल होते. हापूस आंबा हा त्याच्या चवीमुळे देशात नाही तर विदेशातही विशेष लोकप्रिय आहे. आता हापूस पुणे बाजारात दाखल झाला आहे.

यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे.

रत्नागिरीपासून 20 किलोमीटरवर असलेल्या पावस भागातील शेतकरी सुनील यांच्या शेतातील हे आंबे आहेत. मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर त्यांनी रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली. या आंब्याच्या पेटीची किंमत 21,000 रुपये होती. आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करण्यात आला. त्यानंतर आब्याचा लिलाव झाला.

या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी 21 हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली. त्यामध्ये चार डझन आंबे आहेत.
यंदा एक महिना आधीच रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून सध्या आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे. आंबा एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...