पुणे। नगर सहयाद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी एका व्यासपीठावर येत आहेत.
‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता : आव्हाने आणि संधी’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
आज शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी याच्या हस्ते व शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
१४ जानेवारी पर्यंत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेसाठी २७ देशांतील तज्ज्ञ, अडीच हजार उद्योजक आणि दीड लाखाहून अधिक शेतकर्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.