spot_img
महाराष्ट्रशरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा ! म्हणाले, 'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...',

शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा ! म्हणाले, ‘आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर…’,

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री टीम : सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात मालदीव हा विषय चर्चेचा झाला आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वातावरण तापले. सोशल मीडियावरही बायकॉट मालदीव ट्रेंड करत असल्याचेच दिसत असून या प्रकरणी शरद पवार यांनी PM मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शरद पवार म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. इतर देशातील कोणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांविरोधात बोलत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आपल्या देशात त्यांच्याशी कितीही मतभेद असले तरी, इतर देशांतील लोक आपल्या पंतप्रधानांबद्दल बोलू शकत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

निवडणुकीबाबत वक्तव्य
खासदरकीचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. अडीच वर्षांनंतर माझी खासदारकी संपेल. त्यानंतर निवडणूक लढवणार नाही. माझी खासदारकीची टर्म शिल्लक असून तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवले आहे. तिथे काम करु नको का? असा सवालही त्यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...