spot_img
अहमदनगरAhmednagar: आमदार लंके यांना मधु दंडवते आदर्श राज्यस्तरीय लोकप्रतिनिधी पुरस्कार

Ahmednagar: आमदार लंके यांना मधु दंडवते आदर्श राज्यस्तरीय लोकप्रतिनिधी पुरस्कार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
स्वातंत्र्यसेनानी व कोकण रेल्वेचे जनक प्रा. मधु दंडवते यांचे देशाला व राज्याला दिपस्तंभासारखे योगदान असून नगरच्या स्नेहालयात प्रा. मधु दंडवते यांच्या स्मारकासाठी मी पुढाकार घेईल, असे सांगत आ. नीलेश लंके यांनी स्मारकासाठी २५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लंके यांना माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी अमृतमहोत्सव समितीच्या वतीने प्रा. मधु दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ८ डिसेंबरला नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयात आ. लंके यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र, संविधानाची प्रस्तावना आणि सकस वैचारिक पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, उदय दंडवते, स्नेहालयचे गिरीष कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजया चौहान, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, अ‍ॅड शाम असावा, ज्येष्ठ पत्रकार भुषण देशमुख, प्रतिभा कुलकर्णी, स्नेहालयच्या नुतन अध्यक्षा जया जोगदंड, शिवाजी नाईकवाडी, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, गणेश सातपुते, संचालक किसनराव रासकर, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, सरपंच राजेंद्र शिंदे, डॉटर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ बाळासाहेब कावरे, सभापती योगेश मते, भुषण शेलार, अ‍ॅड राहुल झावरे, उद्योजक अजय लामखडे, बाळासाहेब खिलारी, भागुजी दादा झावरे, पोपटराव साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आमदार लंके म्हणाले, आज राजकारण वेगवेगळ्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून गिरीश कुलकर्णी यांनी आदर्श काम केले आहे. माझे पहिले काम स्नेहालय संस्थेसाठी दिले आहे. आदर्श व्यक्तिमत्वाच्या नावाने हा पुरस्कार मला दिला आहे. स्मारकासाठी जी काही मदत लागेल ते देण्यास मी तयार आहे.

यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, देशाच्या जडणघडणीत प्रा. दंडवते यांचे मोठे योगदान आहे. नगरच्या मातीशी एक वेगळी नाळ आहे. पुढील काळात मतपेटी व व्होट बँक हा अजेंडा न राहता पर्यावरण संतुलनासाठी काम केले पाहिजे. यावेळी संपादक विनोद शिरसाठ यांचे भाषण झाले.

यासाठी आ. लंके यांची निवड…

पारनेर आणि नगर तालुयातील दुष्काळ आणि मुलभूत प्रश्न, कोरोना काळात हजारो लोकांची निःशुल्क उपचार सेवा देत वाचविलेले प्राण, मतदारसंघातील विस्थापन रोखण्यासाठी औद्योगिकरणात दिलेले योगदान आणि निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधी, सर्वसामान्यांना सततची उपलब्धता, अण्णा हजारे यांनी मागील दशकात छेडलेल्या विविध जन आंदोलनातील सहभाग या पैलूंचा विचार करून पुरस्कार समितीने आ. लंके यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...