spot_img
अहमदनगरAhmednagar Today News: जितेंद्र आव्हाड यांच वादग्रस्त विधान!! भाजप आक्रमक, रास्तारोको करत...

Ahmednagar Today News: जितेंद्र आव्हाड यांच वादग्रस्त विधान!! भाजप आक्रमक, रास्तारोको करत प्रतिमेला जोडे मारो अंदोलन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
प्रभू श्रीरामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथे नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

श्रीराम भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाड यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शहर सरचिटणीस सचिन पारखे, प्रशांत मुथा, बाबासाहेब सानप, गोपाल वर्मा, मयूर जामगावकर, सचिन पावले, युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ, उपाध्यक्ष स्वप्निल बेद्रे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रभू श्रीरामांबाबत आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना शहरात त्याचे पडसाद उमटले. भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असून, ते प्रभू श्रीराम यांच्या भक्तांच्या भावना दुखावणारं आहे. प्रभू रामाबद्दल अपशब्द बोलणार्‍यांवर कडक कारवाई करुन त्याला अटक करण्याची यावेळी मागणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...