spot_img
राजकारण''जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड...

”जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी…” शालिनीताई पाटील यांचा घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या राजकारणात विविध रंग दिसत आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित दादा व शरद पवार हे एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.

काल (२४ डिसेंबर) अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर वसंतदादांच्या पार्श्वभूमीवर घणाघात केला होता. आता त्याच अनुशंघाने शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर घणाघात केला आहे.

काय म्हणाल्या शालिनीताई पाटील
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये मोठा फरक आहे. शरद पवार यांनी पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी बंड केले होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते असे त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हे बंड होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केलीये.

२०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलत्याचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात करतो त्याच्यावर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही असे त्या म्हणाल्या. अजितदादांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले असून त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आम्ही कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही असं शालिनीताईंनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...