निघोज / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील निघोज ते बोदगेवाडी रस्त्यासाठी ६० लाखांचा निधी मंजूर झाला. आमदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले अशी माहिती पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लंके यांनी दिली.
वीस वर्षांपासून निघोज बोदगेवाडी रस्त्यासाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रमेश ढवळे, किशन कन्हैय्याचे चेअरमन शिवाजी लंके, अशोकराव ढवळे, प्रा.ज्ञानेश्वर कवाद, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, शिवाजी ढवळे, बाळासाहेब ढवळे, राजाराम कवाद, जयराम कवाद, पोपट कवाद, दत्ता कवाद, बाळासाहेब कवाद, सुर्यकांत कवाद, गणेश कवाद,
शांताराम ढवळे, महादेव लंके, मोहनराव कवाद, दिलीपराव कवाद, शांताराम कवाद, शुभम लंके, राजू लंके, दत्तात्रय लंके, किसन लंके, योगेश लंके, संतोष घुले, सोपान नवले, महेश लोळगे, बाळासाहेब पठारे, विष्णू पठारे, सागर पठारे, प्रकाश कवाद, हिराभाऊ कवाद, गुलाब पठारे, संतोष शेटे, संतोष लंके, रूपेश लंके, कैलास कवाद, योगेश कवाद, महादेव कवाद, रामदास कवाद आदींचे प्रयत्न सुरू होते. आता या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर लंके यांनी दिली.
तीन किलोमीटर अंतरावर हायमॅक्स
शाळकरी मुलांसाठी व शेतकऱ्यांसाठी, शेतीच्या कामासाठी या रस्त्याचे काम होणे महत्वाचे होते. निघोज ते बोदगेवाडी रस्त्याचे काम झाल्यावर तत्काळ तीन किलोमीटर अंतरावर हायमॅक्स बसविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पारनेर तालुका पत्रकार संघाने कायमच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले असे पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ ज्ञानेश्वर लंके यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्त्याचे डांबरीकरण
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच या रस्त्याचे डांबरीकरण होउन मजबूत होणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ यांना हा रस्ता अतिशय महत्वपूर्ण असतानाही आजपर्यंत याकडे कुणी लक्ष दिले नाही. आजपर्यंत या परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. आमदार नीलेश लंके यांनी शब्दाला जागत या रस्त्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी दिला आहे. – शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद