spot_img
राजकारणBaba Balaknath : "गँगस्टर, गुंडा शोधूनही सापडणार नाही"; योगी आदित्यनाथांमागे आता बाबा...

Baba Balaknath : “गँगस्टर, गुंडा शोधूनही सापडणार नाही”; योगी आदित्यनाथांमागे आता बाबा बालकनाथ? पहा..

spot_img

नगर सहयाद्री / राजस्थान
Baba Balaknath : आता नुकत्याच पाच राज्याच्या निवडणूक पार पडल्या. त्यात तीन राज्यात भाजप सत्तेत आली. या विजयानंतर चहरचा होऊ लागली आहे ती म्हणजे बाबा बालकनाथ यांची. राजस्थामध्ये हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असे म्हटले जात आहे.

आता नुकताच त्यांनी गँगस्टर, गुंड आता शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता योगी आदित्यनाथांमागे आता बाबा बालकनाथ गुंडांमध्ये दहशत निर्माण करतील असे म्हटले जात आहे. तिजारा विधानसभा मतदारसंघातून बाबा बालकनाथ विजयी झाले आहेत.

बाबा बालकनाथ यांना कन्हैया लालच्या हत्येबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही या प्रकरणात पूर्ण न्यायपर्यंत पोहोचू. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात महिलांवर अत्याचार झाले. गँगस्टर, गुंड आता शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल,

तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, हा माझा विषय नाही. निवडणूक जिंकणं हे माझं काम होतं आणि आता पुढे सेवा करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान राजस्थानमध्ये भाजपचा विजय झाला त्यामागे त्यांनी नेमके काय कारण आहे असे विचारले असता ते म्हणाले की, गेहलोत यांच्याकडे कोणतीही योजना नव्हती. फक्त खोट्या गोष्टींची पेटी होती, प्रत्यक्षात काहीही नव्हतं असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...

संक्रातीच्या मध्यरात्री घटना; दोन तरुणांचा मृत्य, चौघांवर उपचार सुरू…नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथे चालकाचा कारवरील ताबा...

मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का; अजितदादांचा मोठा निर्णय..

बीड । नगर सहयाद्री:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन...