spot_img
अहमदनगर'गोड' साखरेचा हंगामा 'कडवट', साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर

‘गोड’ साखरेचा हंगामा ‘कडवट’, साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर

spot_img

नगर सह्याद्री टीम-

यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत उसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, साखर कारखानदारांमध्ये उसाची पळवापळवी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अवघे तीन महिनेच कारखाने सुरू राहणार असल्याने साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढणार आहेत.

अवकाळी पाऊसाचा गाळप हंगामाला फटका

सार्वत्रिक अवकाळी पाऊस आणि पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उसाच्या फडांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. उसाच्या फडामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे ऊस तोडी यंत्रणा ठप्प झालेलीअसून परिणामी साखर कारखान्याच्या दैनंदिन गाळपावर परिणाम झाला आहे. गतवर्षी ८.६९ असलेला उतारा यंदा ७.८३पर्यंत खाली घसरला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के साखर उत्पादन कमी होणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन घटणार

राज्यात १ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू झाला. यंदा कारखाने १५० दिवसांऐवजी केवळ ९० दिवसच चालणार आहेत. मुळात यंदा ऊसाची लागवड कमी आहे. शिवाय अनियमित पावसामुळे वाढीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे ऊस कमी असल्याने यंदा केवळ तीन महिने कारखाने सुरू राहण्याची अपेक्षा आहे. यंदा साधारणत: ९७० लाख मे. टन ऊस उपलब्ध होईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के साखर उत्पादन कमी होणार आहे.

कारखानदारांवर ऊस घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला. पहिल्या महिन्यात गाळप आणि उत्पादन या दोन्हींमध्ये घट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.अवकाळी पावसामुळे फडांमध्ये चिखल झाल्यामुळे ऊसतोड यंत्रणात जवळपास ठप्प झाली आहे. मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली तरीही दुष्काळजन्य संकटामुळे ऊस उत्पादन घटल्यामुळे साखर कारखानदारांवर ऊस घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची वेळ आली आहे. ऊस दर देण्याची कारखानदारांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...